म्हसळ्यातील वन समितीला वन ग्राम पुरस्कार मिळवून देणार : गोरनाक


म्हसळा : प्रतिनिधी
रोहा वनविभागातील म्हसळा वनक्षेत्रामधील संयुक्त वनव्यवस्थापन समिती घुम रुद्रवट येथे रा . जि . प . शाळा यांचे संयुक्त विद्यमाने वनमहोत्सव कार्यक्रम करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी घूम येथे धोंडू घोळे आणि विकास पाटील , धोंडू बोर्ले हे होते ग्रामस्थमहिला यांचे हस्ते करण्यात आला . शाळेतील मुळे मोठ्या संख्येने उपस्थित होते . आपले मार्गदर्शनात बाळकृष्ण गोरनाक परिमंडळ वन अधिकारी यांनी सांगतले तेळीघूम रुद्रवट हि समिती आमच्या खात्याच्या सर्व योजना यशस्वी करण्याचे १००टक्के सहकार्य केले . या या समितीने सर्व ग्रामस्थांना एस . पी . रॉस , भातशेती नुकसानी पाळीव जनावरांची नुकसानी झाल्यास त्यांना प्रामाणिकपणे न्याय दिला जाईल त्यामुळेच यावर्षी सन २०१८ - १९ चा महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार तालुक्यातील उत्कृष्ट काम करणार्या सालविंडे , घूम रुद्रवट , ठाकरोली या समित्यांचे प्रस्ताव पाठवले जातील व त्यांना ते मिळवून देणारच असा निर्धार व्यक्त केला . आता पर्यंत तालुक्यात सन २०१० - ११ ते सन २०१६ १७ पर्यंत जिल्हा स्तरीय संत तुकाराम वन ग्राम रक्कम ३१००० समित्यांना दिले आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा