श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील नागरी सुविधांचे प्रश्न सार्वत्रिक आहेत . सामान्य नागरिकांना किमान सुविधांची तेवढी अपेक्षा आहे . शहरांच्या विकासात , उद्योग व व्यावसायिक घटकांचे मोठे योगदान असते . उद्योग विकासाशी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट संबंध नसला तरी उद्योगांना पूरक वातावरण संस्थांच्या मदतीने होऊ शकते . तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून नवीन उद्योग येऊ शकतात , ते आगामी काळात आणले पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील समस्या कायम आहेत . त्या नागरी सुविधांशी संबंधित असून शहराच्या वाढत्या व्यापामुळे त्या वाढतच आहेत . त्यावर कायमस्वरूपी सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही . सध्या श्रीवर्धन नगरपालिकाच्या प्रचारात प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने जाहीरनामा सादर केला खरा मात्र विकास अद्यापही सापडत नाही . प्रत्यक्षात शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठोस अजेंडा नाही शाश्वत शहर कुणाकडेच दिसत . विकासाची हमी कोण देणार ? हा प्रश्नच आहे .
लोकप्रतिनिधींची पाठ...
श्रीवर्धन मतदार संघात मतांचे राजकारणाची बेरीज मोठ्या संख्येने होते . विद्यमान आमदार अवधूत तटकरे व खासदार अनंत गीते मतदार संघात फिरकताना दिसत नाही . खासदारांनी दत्तक घेतलेल्या दिवेआगर या निसर्गरम्य गावाची देखील भेट घेणे दुरापास्त आहे त्यामुळे अशा लोकप्रतिनिधी मुळे तालुक्यातील विकास कसा बनले होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे
उद्योगांसाठी वातावरण तयार केले पाहिजे..
श्रीवर्धन ला निसर्गाची मोठी देणं लाभली आहे . विस्तीर्ण समुद्रकिनारी पाहायला दरवर्षी हजारो पर्यटक वर्षभरात येत असताना दिसतात . मात्र याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अनास्था मुळे पर्यावरण पूरक असे उद्योग काही जन्माला आले नाही . यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी , आमदार खासदारांची महत्त्वाची भूमिका असते प्रत्येकाने उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार केले पाहिजे . त्यातून उत्पन्नाचा स्रोतही निर्माण होईल , रोजगारही वाढेल . रोजगार वाढला की , व्यवसायही तेजीत येतात आणि बाजारपेठेतील अर्थचक्र गतिमान होते , असा हा सर्वांगीण परिणाम असतो . त्यामुळे नागरी सुविधांसोबतच उद्योग - व्यवसाय वीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे
पायाभूत सुविधांचा अभाव...
तालुक्यातं पायाभूत सुविधांचा अभाव आहे चांगले रस्ते , भुयारी गटारी , समांतर रस्ते , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही . त्याचा एकत्रित परिणाम शहरातील नागरिकांच्या मानसिकतेवर होत असतो . अनेक वर्षांपासून या सुविधा नसल्याने नागरिकांनी वास्तव स्वीकारल्याचे दिसते . हे चांगले चित्र नाही . त्यामुळे येणाच्या निवडणुकीत नागरिकांनी सारासार विचार करुन जो पक्ष , जो उमेदवार खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास करु शकतो , किमान त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु शकतो , त्यालाच मतदान केले पाहिजे .
Post a Comment