महसूल दिनानिमित्त श्रीवर्धन येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन..

( म्हसळ प्रतिनिधी)
दि.31- महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवार दि.1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय मुख्य सोह्ळ्याचे आयोजन श्रीवर्धन येथे मध्यवर्ती प्रशासकीय भवन,तहसिल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
 महसूली वर्ष दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरु होते. दि.19/7/2002 च्या शासन परिपत्रकान्वये दिनांक 1 ऑगस्ट हा दिवस महसूली दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अदयावत करणे, वसुलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसुल वसुलीचे उदिद्ष्ट पार करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा गुणगौरव यानिमित्ताने केला जातो.
यंदाचा महसूल दिन बुधवार दि.1 ऑगस्ट, रोजी सकाळी 11वाजता, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महसूल दिनांला सन 2017-18 या महसूली वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा व सन 2017-18 या वर्षात शैक्षणिक/सांस्कृतिक/क्रिडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्या पाल्यांचाही कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानार्थिंना सन्मानित केले जाणार आहे. या सोहळ्यास महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा