संजय खांबेटे , म्हसळा
नव्याने पोलीस आधिकारी आल्यावर सुरवातीलाच चोरी -दरोडा- घरफोडया करून आपली गुन्ह्याची स्टाईल दाखवायची ( ModIus 0peration) मग म्हसळा करांजवळ जुळवून घेयचे सन २०१४ -१५ मध्ये खरसई- निगडी -कांदळवडा या ग्रामीण भागांत घरफोडया तर पांगळोली येथे दरोडा असा प्रकार झाला होता त्यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळीनी
म्हसळा तालुक्याच्या ग्रामिण भागाला लक्ष केले होते. कालच नव्याने म्हसळा शहरातील भर वस्तीतील फ्लॅटची दिवसा ढवळया कडी -कोयंडा तोडून तब्बल रु ६५, ५०० चा ऐवज लंपास केल्याच्या घटनेची म्हसळा पोलीसानी नोंद केली आहे.
इरम मतीन काजी वय ३१ यानी दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. २८/२०१८ भा.द.वी.४५४, ३८० प्रमाणे सदर घटनेची म्हसळा पोलीसानी नोंद केली आहे. फिर्यादी यानी दिलेल्या माहीती वरुन सोम .दि.७ ऑगस्ट रोजी दु. १ .३० ते ४.३० च्या दरम्यान फ्लॅट बंद असताना सदरची घटना घडली. घरफोडी मध्ये २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया, ५ ग्रॅम वजनाचे एक लॉकेट, २ जोड ( एक लहान व मोठे) चांदीचे पैंजण व रु .२२ हजार रोख असा रु ६५, ५०० चा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीने सांगितले. काजी यांचे घर हे अत्यंत रहदारीच्या अशा पोस्ट ऑफीस जवळील रोघे बिल्डींग मध्ये आसल्याने भरदिवसा घरफोडी मुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अद्यापही डॉग स्कॉड अगर ठसे तज्ञ आले नाही, त्याना कळवले आहे ,आजु -बाजुचे व परिसरांतील C. C. T. V. फुटेज वरून तपास दृष्टीक्षेपांत आहे. शहरांतील सोने चांदीचे सराफी व्यापारी याना विशेष सुचना दिल्या आहेत.प्रविण कोल्हे, स. पो.नी. म्हसळा.

Post a Comment