Privacy Policy

व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण...
सोशल प्रकाशन समूहाच्या म्हसळा लाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे. तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची कोणतीही माहिती आम्ही साठवून ठेवत नाही.

व्यक्तिगत माहिती जमा करणे...
तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि तुमची आवड अशी माहितीसुध्दा आम्ही जमा करतो. विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते. उदा. तुम्ही तुमचे नाव आणि ईमेल आयडीची नोंदणी आमचे न्यूजलेटर मिळवण्यासाठी अथवा एखाद्या चर्चेत भाग घेऊन त्यावर प्रतिक्रिया पाठवण्यासाठी देऊ शकता. ‘ही बातमी ईमेल करा’ किंवा व्हाट्सअँप न्युज बुलेटिन हा पर्याय वापरण्यासाठी तुम्ही तुमचे नाव, इ-मेल आयडी तसेच अन्य कुणाचा इ-मेल आयडी देऊ शकता किंवा मोबाइल नंबर देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.

त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल. या संकेतस्थळांना भेट देणार्यांनी त्या संकेतस्थळांच्या खासगीपण जपण्याच्या धोरणाची नीट चौकशी करावी. त्यांच्या या धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.

तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे त्रयस्थ तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (तुमचे नाव, पत्ता, इ-मेल इ. यांचा समावेश यामध्ये असणार नाही.) गोळा केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती तुमच्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

इतर संकेतस्थळांना जोडणे
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा