श्रीवर्धन : भारत चोगले
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य मिरविणाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन येथील एसटी स्थानकातील गैरसोयीमुळे प्रवाशांचे तसेच राज्यभराताल आलेल्या पर्यटकांचे प्रचंड हाल होउ लागले आहेत . एसटी स्थानकामध्ये वरिष्ठ अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे स्थानकातून गाडया वेळेवर सुटत नाहीत व काही गाडयांच्या फया रद्द करण्यात येत असतात येथून सुटणाऱ्या काही गाड्यांवर नामफलक नसल्यामुळे कोणती गाडी कुठे जाईल याबाबत प्रवाशांमध्ये नेहमीच संभ्रण निर्माण होत असतो . या स्थानाकातील समोरील भागामध्ये गटाराची पुर्ण व्यवस्थान केल्यामुळे पावसाचे पाणी स्थानकामध्ये साचलेले असून त्याच पाण्यामधुन आगारातील एसटी बस तसेच श्रीवर्धन आगरातील एसटी बस बाहेरच्या बऱ्याच गावामधुन आल्यावर ती एसटी स्थानकांध्ये लावताना त्या साचलेल्या पाण्यामध्युन फिरवुन लावली जाते . त्या जागेवरून एसटी बस फिरविताना साचलेले पावसाचे पाणी प्रवासाच्या अंगावर उडाल्याने कपडे खराब होत असतात पावसाळा असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील लाईट सतत येजा करित असल्याने बयाच वेळा श्रीवर्धन एसटी स्थानकामध्ये अंधार असतो . साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य असा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी तलावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्यापुर्वी गटारे , नाले यांची साफसफाई करून न घेतल्याने असे प्रकार दिसुन येत आहेत . सध्या या बसस्थानकामधन वेळेवर गाडया सुटत नसल्यामुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना एसटीची वाट पाहत तासनतास रखडावे लागत आहे . परिणामी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे मंडळ असे प्रवाशांकडून बोलले जात आहे आता तर पावसाळा सुरू असल्याने श्रीवर्धन बसस्थानकामधुन मुंबई , पुणे इत्यादी ठिकाणी सुटणार्या अनेक एसटी बसच्या फेऱ्याही रद्द केल्या गेल्याने श्रीवर्धन तालुक्यामधून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल झाले आहेत . श्रीवर्धन एसटी स्थानकामध्ये अजुनही शौचालयाची व्यवस्था पुर्ण न झाल्यामुळे तालुक्यातील प्रवास करण्यासाठी येणाऱ्या तसेच बाहेरगावाहुन श्रीवर्धन बसस्थानकामध्ये आलेल्या पर्यटकाला किंवा एखाद्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाश्याला शौचालयास जाण्यची वेळ आल्यास त्याची फार पचांयत होत आहे त्याचप्रमाणे श्रीवर्धन एसटी स्थांनकाच्या अवती भवतीच्या परिसरामध्ये गुराच्या शेणाचे जणू साम्राज्यच पसरलेले आहे स्थानमध्ये पडलेल्या गुरांच्या शेणामुळे एखाद्या पर्यटकाचा किंवा प्रवाशाचा पाय घसरून पडण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही . वेळ प्रसगी जिवितहाणी होउ शकते . अश्याप्रकारे अनेक गैरसोयींमुळे प्रवाशांचे हाल होत आहे इत्यादी अनेक समस्या स्थानकातील वरिष्ठ अधिकार्या दिसत असुन सुध्दा याकडे कानाडोला होत आहे . तरी रायगड जिल्यातील पेण येथिळ वरिष्ठ अधिकाऱ्याने या अनेक भेडसावत असणाच्या प्रवाशांच्या समस्याकडे लक्ष दयावे अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील प्रवाशीवर्ग व पर्यटकामधून केली जात आहे .
Post a Comment