म्हसळा तालुका खड्ड्याचे साम्राज्य : सार्वजनिक बांधकाम खाते,जिल्हा परिषद, रस्ते विकास महामंडळाच्या गुणवत्ता पुर्ण कामाचे लक्तरे ; जनता त्रस्त ठेकेदार मस्त

म्हसळा तालुका खड्ड्याचे साम्राज्य : सार्वजनिक बांधकाम खाते,जिल्हा परिषद, रस्ते विकास महामंडळाच्या गुणवत्ता पुर्ण कामाचे लक्तरे ; जनता त्रस्त ठेकेदार मस्त

म्हसळा प्रतिनिधी अरुण जंगम
या वर्षीच्या पहिल्या पावसाने बांधकाम खात्याच्या दर्जेदार कामाचे प्रदर्शन म्हसळा तालुक्यातील जनसामान्यांना घडवले आहे .रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
    म्हसळा तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था बनली आहे .म्हसळा ते दिघी 30 किमी चे अंतर आहे .म्हसळा शहरा पासून बनोटी ,खरसई,मेदडी, वारळ, काळसुरी ,तुरुबाडी, रोहिणी ,हरवीत, कुडगाव ही मुख्य लोकसंख्येची गावे आहेत  .म्हसळा शहराच्या दिघी मार्गावरील  रस्त्याची पूर्णतः वाताहत झालेली आहे .दुचाकी स्वार किंबहुना छोटी रिक्षा सहज लुप्त होईल या आकाराचे खड्डे पडलेले आहेत .मेदडी गावाच्या एस बस थांब्याच्या लगत रस्ता पूर्णपणे खचला आहे .मेदडी शिवाजी नगर ते खरसई रस्ता वळण वळणाचा आहे तीन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी एस टी बसच्या अपघातात अनेक व्यक्ती गँभिर स्वरूपाच्या जखमी झालेल्या आहेत .रस्ताची रुंदी 18 फुट आहे .हरवीत, कुडगाव ते दिघी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे .हरवीत जवळ काही ठिकणी रस्ता खचला आहे .दिघी पेट्रोल पंपा जवळ मोठ मोठी खड्डे पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दिघी पोर्ट च्या अवजड वाहतुकीचा परिणाम सर्वत्र निदर्शनास येतो आहे तर तालुक्यातील धनगर मलई रोड तसेच पांगलोली रोडचे हालत बेकार झाली असुन प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.पांगलोली हे अली कौचाली राष्ट्रवादी कॉ,ग्रेसचे जेष्ठ नेते यांचे गाव असुन या मार्गावर भले मोठे खड्डे पडले असुन सार्वजनिक बांधकाम विभाग याकजे पुर्ण पणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
   म्हसळा तालुक्यात पर्यटनास चालना मिळाली आहे .त्यामुळे पर्यटक व भाविकांची अलोट गर्दी सदैव निदर्शनास येते आहे  .श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी म्हसळा शहर प्रवेशद्वार मानले जाते तसेच दिवेआगार व दिघी कडे मार्गक्रमण करण्यासाठी म्हसळा शहर महत्त्वाचे आहे. तर 

म्हसळा तालुक्याचे  प्रवेशद्वार असलेल्या  घोणसे घाटात अपघाताची मालिका अखंड पणे चालू असल्याचे दिसून येत आहे. सन 1995ते सन2012 पर्यंत विविध अपघातात अनेक लोकांना जीव गमवावा  लागलेला आहे .परंतु सार्वजनिक बांधकाम खात्यास त्याचे तीळमात्र गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते .
      अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना मध्ये त्रुटी आढळत आहे .अपघात प्रवण क्षेत्रात सूचना फलकावर व्यतिरिक्त काहीच काम केल्याचे निदर्शनांस येत नाही . त्याचप्रमाणे संपुर्ण घोणसे घाटात दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे रोडला खड्डे पडुन काही अवघड वळणांवर रोडची खडी बाहेर आलेली स्पष्टपणे दिसत असल्याने अपघातांची तीव्रता अजुनही वाढली आहे.
श्रीवर्धन  हे नावारूपांना येणारे पर्यटन क्षेत्र आहे . श्रीवर्धन नगरपरिषद प्रत्येक महिन्याला सत्तर हजार रुपये पर्यटक निधी जमा करते . परंतु म्हसळा तालुक्यात रोडला पडलेल्या खड्यांमुळे पर्यटकांचा ओढा कमी झालेला दिसत आहे.   महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक श्रीवर्धन व श्रीक्षेत्रहरीहरेश्वर येथे हजेरी लावतात .मुंबई , पुणे  येथील पर्यटक आठवडा सुट्टीसाठी श्रीवर्धन व दिवेआगर ला पसंती देतात .त्या कारणे माणगाव शहरातून लोणेरे व साई मार्गे पर्यटक श्रीवर्धन व दिवेआगरकडे मार्गक्रमण करतात .    
माणगाव  साई मार्गे  श्रीवर्धन अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर आहे .तर मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे पासून श्रीवर्धन पन्नास किलोमीटर अंतरावर आहे .पर्यायाने पर्यटक दोन्ही मार्गांचा अवलंब करतात .साई मार्गेम्हसळा श्रीवर्धन हमरस्त्यावर नाइटने ,मोर्बाघाट, घोणसे घाट ही अपघात प्रवण क्षेत्रे असताना ह्या घाटाची कोणतीही दुरुस्ती केलेली दिसत ऩाही.

तालुक्याची लोकसंख्या  .जवळपास तीसहजारांच्या   आसपास  आहे .तालुक्यात शेती व्यवसायाला वाव असुन  घरटी एक व्यक्ती मुंबई स नोकरी करतो .मात्र रोडला पडलेल्या खड्यांमुळे तालुक्यांमध्ये शासकीय अथवा बाजारहाट करण्यासाठी येणारे नागरीकही दिघी पोर्टच्या वाहतुकीने रोडची झालेली वाताहत पाहुन कंटाळलेले दिसत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच रोडची सार्वजनिक बांधकांम विभागाच्या  व दिघी पोर्ट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाताहत झाली असुन या रस्त्यांवर दुचाकी चालविणे देखील जिकरीचे झाले आहे.


   "म्हसळा दिघी या राज्यामार्गावर आंम्ही रोज बोर्लीपर्यंत मिनिडोअर चालवीतो मात्र या रोडवर दिघी पोर्टची अवजड वाहतुक कायम स्वरुपी सुरु असल्याने रोडची अवस्था फार बिकट झाली आहे त्यामुळे प्रवासी वाहन चालविताना आंम्हास फार मोठा त्रास होत असुन पोलीस प्रशासनाने या अवजड वाहतुकीवर कारवाई करावी "
  अभय कलमकर अध्यक्ष  मिनिडोअर प्रवासी वाहतुक संघटना

   " सदर दिघी पोर्टच्या ओव्हरलोड गाड्यांवर पोलीसांनी कारवाई करणे गरजेचे आहे मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने दिघी पोर्टची वाहतुक भर दिवसा देखील सुरु असते त्यामुळे रोडची अवस्था फार बिकट झाली आहे  व या सर्व गोष्टींना दिघी पोर्ट जबाबदार आहे"
     अनुजा हीरेमठ
अध्यक्ष आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती म्हसळा

   " श्रीवर्धन आगाराच्या सर्व चालकांना अपघात प्रवण क्षेत्रात त्याचप्रमाणे खड्डेमय रस्त्यांवर सावधानतेने वाहन चालविण्याचे सांगितले असुन सर्व चालक नियम पाळत आहेत "
रेश्मा गाडेकर
 आगारप्रमुख श्रीवर्धन आगार


" जवळपास सर्वच मार्गावर खड्डे पडल्याने चालकांना वाहन चाललविणे त्रास दायक होत असल्याने लवकरात लवकर या रस्त्यांचे काम करावे.
सचिन गुरव
चालक श्रीवर्धन आगार तथा सचिव कामगार सेना श्रीवर्धन आगार

    " म्हसळा शहराची सुरवात होते ती म्हसळा चेक पोस्ट पासुन चेक पोस्ट ते श्रीवर्धन हमरस्ता व दिघी रोड फातीमा मेंशन पर्यंत 478 जिवघेणे खड्डे पडले असुन सदर खड्ड्यांबाबत प्रशासन निद्रीस्त असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा