श्रीवर्धन मधील हटभट्टीच्या अनधिकृत दारूविक्री बाबत मनसे आक्रमक झाली असून नागरिकांनी सांगितलेली समस्या समजून घेत मनसे नेते श्री नितिन नांदगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत श्रीवर्धन मधील महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. शिवाय नितीन नांदगावकर स्वतः श्रीवर्धन मध्ये येऊन यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी एक व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितले..
श्रीवर्धन तालुक्यातील हातभट्टीची दारू बंद करा...
माता-भगिनींचा, विधवा बायकांचा आक्रोश...
गाळसूद काठी आणि निगडी काठी मधील गावात दारूच्या हातभठ्या...
श्रीवर्धन तालुक्यात या दोन गावात घरोघरी गावठी दारूचे बाजार..
आणि बळी जाणारी तरुण पिढी.....
अख्या गावाला गावठी विषारी दारूचे व्यसन, जागोजागी हातभठ्या कोणाच्या आशीर्वादाने...??
विषारी दारू पिऊन कुटूंब होतंय उध्वस्त.....तरीही कोणी बोलायला तयार नाही...??
तहसीलदार आणि पोलीसांची बघ्याची भूमिका....??
प्रत्येक कुटुंबातील सदस्य विषारी दारूच्या आहारी जाऊन खोकला झालाय...
कोण आहेत हे दारूचे माफिया जे बिनधास्त दारूच्या हातभठ्या चालवतायत..विरोध का होत नाही.?
लवकरच श्रीवर्धन तालुक्यातील गाळसूद आणि निगडी काठी गावांना भेट देणार.....
महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा विषारी दारूभट्या बंद करणारच.....
दुसरी कडे मुंबईत गल्ली बोळात, कॉलेज बाहेर पोलीस ठाण्याबाहेर खुलेआम अफीम, गांजा, एमडी पावडर विकली जाते...
कॉलेज मधील मुले सुद्धा आता ड्रग्स घेऊ लागलेत त्यामुळे गुन्हेगारी वाढलीय
जिथे बघावे तिथे गर्दुल्ले....
रिक्षा-टॅक्सी वाले सुद्धा नशेच्या आहारी जाऊन गाड्या चालवतायत....
तर काही गर्दुल्ले पैशासाठी लोकांना शिकार बनवतायत...
एकीकडे गावठी दारू आणि दुसरीकडे ड्रग्सचे धंदे फोफावतायत....
जिथे जिथे चुकीच्या गोष्टी होत असतील तिथे तिथे पोचण्यासाठी प्रयत्न करणारच....
महाराष्ट्र सैनिक....
नितीन नांदगावकर यांच्या fb पेजवरून
Post a Comment