माणगाव : प्रतिनिधी
श्रीवर्धन - माणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात पावसाने थैमान घातल्याने दिघी माणगांव रस्ता रुंंदीकरण आणि भरावाच्या कामाने मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे . मात्र दिघी पोर्टच्या अवजड वाहनाने काही ठिकाणी हा रस्ता खचत आहे . मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे . दिघी - माणगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्र व राज्य शासनाने घोषित केला . या चारपदरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली . रुंदीकरण आणि भराव पावसाअगोदर सुरुवात झाली खरी . पण सतत कोसळणाच्या मुसळधार पावसामुळे माणगाव - मोरबा , नळेफडी , चांदोरे रस्त्यावर केलेल्या भरावामुळे मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे . या मार्गावर सतत रहदारी सुरु असतेच . शिवाय दिघी पोर्टवरून कोळसा व कॉईल वाहतूक करणार्या अवजड वाहनांची रहदारी सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे या ठिकाणी दुचाकी वाहने व रिक्षा चालकांची वाहने चालविणे कसरतीचे झाले आहे महामार्गाचे काम करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून जरी तात्पुरती डागडुजी चालू असली तरी या दरम्यान अनेक छोटे - मोठे अपघात झाले आहेत . दिषी पोर्टवरून कोळसा व कॉइल घेऊन जाणाच्या अवजड वाहनांना मात्र जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांनी अवजड वाहनांना रोखणे आवश्यक आहे . अशा प्रकारची दुर्घटना घडण्याआधीच ठोस उपाययोजना केल्यास सुरक्षित वाहतुकीला मदत होईल , असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे

Post a Comment