म्हसळ्यात कोळशाचे ट्रक चालू असल्याने अपघाताची शक्यता ; दिवसाचे कोळशाचे ट्रक बंद करा नाहातर आंदोलन करू - बाबू बनकर


म्हसळा : महेश पवार
 म्हसळा शहरामध्ये भरदिवसा कोळशाचे लझक सुरु असताना त्याच्यामध्ये मुलांची शाळा सुटण्याची वेळ आणि हे एक धावण्याची वेळ यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही . या विषयी सविस्तर वृत्त असे की , कोळशासाठी जाणारे भलेमोठे जाणारे ट्रक हे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुटण्याच्या वेळेत अतिवेगाने धावत असतात मात्र त्याच रस्त्याने न्यु इंग्लिश स्कूल व अन्य शाळेतील १७०० ते १८०० विद्यार्थी येत असतात रस्त्याच्या दुतर्फ साईटपी कमी असल्याने विद्यार्थीना पायी प्रवास करणे कसरतीचे होत आहे त्याच्यामध्ये हेच धावणारे कोळशाचे ट्रक विद्यार्थाच्या जीवावर उठले आहेत कधी कोणता अपघात होईल हे सांगता येत नाही परंतु कोळशाचे ट्रक भरदिवसा गेल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या कोळशाच्या ट्रकला सकाळी ७ च्या पुर्वी व रात्री ९ नंतर अशी वेळ दिली असताना देखील हे भर दिवसा का धावतात यांच्यावरती पोलिसांचे बंधन नाही का ? असा एक नव्हे अनेक सवाल सामान्य जनता करत आहे या विषयी म्हसळा बहुजन समाज सेवक बाबू बनकर यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे या वाहनांमुळे अपघात झाला त्याच्या वरती मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करा तत्पूर्वी हे चालणारे कोळशाचे ट्रक पुर्वरीत बंद करावे अन्यथा आम्ही सर्व समाज एकत्र ऐऊन आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या विषयी म्हसळा पोलिसांना देखील विशेष लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बाबू बनकर यांनी केली आहे . 

म्हसळा शहरातील रहदारी वाढत चालली आहे रस्त्यातून चालण्यास साईट पट्टी देखील कमी आहे . शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत कोळशाचे ट्रक भरधाव वेगाने धावत असतात त्यामुळे कधी आणि केव्हा अपघात होईल हे सांगता येत नाही . या ट्रकवर नियंत्रण आणा नाही तर तीव्र आंदोलन करू - प्रविण बनकर 

कोळशाचे ट्रक जर का भरदिवसा सुरू असल्याचे आढल्यास त्यांचावरती कडक कारवाई केली जाईल . त्यांना सकाळी ७ पूर्वी व रात्री ९ नंतरच सुरु ठेवण्याची वेळ दिलेली आहे . -श्री . कोल्हे म्हसळा, पोलिस निरीक्षक 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा