प्रज्ञा शोध परीक्षेत यशस्वी संजना धुमाळे चे सर्वत्र कौतुक ; शिक्षक व पालकांकडून अभिनंदन चा वर्षाव तर ज्ञानदान क्लासेस च्या वतीने सत्कार



श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन मधील संजना कृष्णा धुमाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .तालुक्यात पाच विध्यार्थी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र ठरले आहेत. संजना श्रीवर्धन मधील रवींद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आहे .प्रथम भाषा व गणित या विषयात तिला 84 व तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयात 158 गुण प्राप्त झाले आहेत . संजनाचे वडील  कृष्णा धुमाळे जिल्हा परिषद शाळा भरडखोल येथे प्राथमिक शिक्षक आहेत.व आई गृहिणी आहे . संजनाला प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे .तिच्या स्वप्नांना मुक्त आकाश देण्याची वडिलांची भूमिका आहे .संजना च्या यशा बद्दल ज्ञानदान क्लासेस च्या श्री संदीप आव्हाड सर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा