प्रतिनिधी : म्हसळा
योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार, महाराष्ट्र योगा असोसिएशन च्या अधिपत्याखाली, योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने रविवार दि.१५ जुलै २०१८ रोजी १३ व्या जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी,पनवेल येथे करण्यात आले आहे, सदर स्पर्धा वय वर्ष ८ते ११, ११ते १४,१४ते १७,१७ते२१,२१ते२५,२५ते३५, व ३५ वर्षा पुढील अशा प्रकारे मुले/पुरुष, मुली/महिला अशा एकूण १४ वयोगटात घेतली जाणार आहे, या निवडलेल्या ४२ स्पर्धकांचा संघ १७ ते १९ ऑगस्ट२०१८ रोजी ( आत्मा मलिक ध्यानपिठ,एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोकमठाण,ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर,महाराष्ट्र)येथे होणाऱ्या३७ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीतत्व करतील.
स्पर्धकांना आपल्या वयोगटातील सिल्याबसमधील १० आसनांपैकी लॉटरी पध्दतीने किंवा पंचांनी निवडलेली कोणतेही ५ आसने करावी लागतील. सर्व वयोगटाचा सिल्याबस www.yogafederationofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आसनांचा कालावधी प्रत्येकी ३० सेकंद असेल.स्पर्धकांनी जन्मतारखेच पुरावा व पासपोर्ट साईज ४ फोटो आणावेत. ३१ डिसेंबर २०१८ ही तारीख वयासाठी ग्राह्य धरली जाईल.अधिक माहिती करिता संघटनेचे सचिव हेमंत पयेर ९८६०६०१७३६ व उत्तम मांदारे ८७७९६२८८५१ यांच्याशी संपर्क साधावा व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील वारंगे यांनी केले.

Post a Comment