श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. पावसा सोबत वादळी वारा असल्यामुळे दरडी कोसळणे ,रस्ते खचणे तसेच अनेक महाकाय वृक्ष, व महावितरणाचे आठ खांब जमीनदोस्त झाले .पर्यायाने श्रीवर्धन मधील जनजीवन विस्कळीत झाले होते.
वादळे वाऱ्याने जमीनदोस्त झालेले म्हसळा ते गोंनघर रस्त्यावरील विद्युत महामंडळाचे आठ खांब पुर्ववत करण्याचे खांब महावितरण खात्याने युद्ध पातळीवर सुरू केले आहे. बोर्लीपंचतन विभागातील विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी अंदाजे तीन दिवस लागणे अपेक्षित होते .पावसाळ्यात वादळी वारे व इतर नैसर्गिक आपत्ती पासून सामना करणाऱ्या सर्व सामान्य माणसाला समाधान लाभावे या साठी महावितरण मंडळाने तात्काळ श्रीवर्धन मधून विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन जोडून बोर्लीपंचतन विभागास विद्युत पुरवठा केला. तीन दिवस अंधारात राहव्या लागणाऱ्या बोर्लीपंचतन पंचकोशी मधील जनतेस महावितरण मंडळाने दिलासा दिला.
आज तालुक्यात सर्वत्र
चिखल , व पाण्याचे साम्राज्य आहे .अशा खडतर परिस्थिती मध्ये महावितरणचे कर्मचारी खांब लावण्याचे काम करत आहेत. सदर खांबाचे वजन इतर खांबा पेक्षा जास्त असल्याने एक खांब उचलण्यास अनेक व्यक्तीची गरज आहे. पावसाळ्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून महावितरणने जनताभिमुक कार्य केले आहे.ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी महावितरण कार्यशील असल्याचे निदर्शनास येते आहे.श्रीवर्धन तालुक्यात आज महावितरणाचे हजारो ग्राहक आहेत .अन्न, वस्त्र व निवारा या प्रमाणे आजमितीस विद्युत जीवन आवश्यक घटक बनली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, शिस्ते, वेळास, आदगाव, कुडगाव, दिघी, या गावातील परिस्थिती पावसाळ्यात विलक्षण गँभिर रूप धारण करते .त्या मध्ये वीज नसल्यास जनतेच्या अडचणीत मोठया प्रमाणात वाढ होते. विद्युत महामंडळाने दाखवलेली कार्यतत्परता निश्चितच सुखद आहे .
निरंतर तीन दिवस पडलेल्या पावसाने म्हसळा ते गोंनघर विद्युत वहन करणारे आठ खांब पडले .आज पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली आहे त्यामुळे विद्युत खांब उभे करण्यात चांगले साह्य मिळाले आहे . जमीनदोस्त झालेले खांब उभे झाले आहेत .फक्त वीज तारा जोडणी बाकी आहे .लवकरच बोर्लीपंचतन विभागाचा मुळ विद्युत पुरवठा पुर्ववत करू
-महेंद्र वाकपैजन (मुख्य अभियंता महावितरण श्रीवर्धन)
महावितरण खात्याने दाखवलेली कार्यतत्परता निश्चितच सुखद आहे .महावितरण कंपनीने तात्काळ पर्यायी पद्धतीने विद्युत पुरवठा केला आहे.त्यामुळे जनतेचे हाल झाले नाही .त्या बद्दल महावीतरणास धन्यवाद
-धवल तवसाळकर (ग्रामस्थ वेळास )

Post a Comment