श्रीवर्धन : प्रतिनिधी
निऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी पाहणी केल्याप्रमाणे मेटकर्णी वर्ग ३ व बांगमाडला वर्ग २ वर्गीकरणनुसार दरडग्रस्त नोंदणी करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा व्यवस्थापन अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी , सा . बां . विभाग व ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे आराठीतील मेटकर्णी व बांगमाडला ग्रा . पं . मधील हनुमान रामवाडी या दोन दरडग्रस्त संवेदनशील वर्ग या प्रवर्गातील भागास भेट दिली . अतिवृष्टीने दरड कोसळण्याची शक्यता आहे . आतापर्यंत घरे पावसाच्या अतिवृष्टीमुळे कोसळली आहेत . त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष दरडग्रस्त पव्रण भागामध्ये जावून पहाणी केली व महत्वाच्या सुचनाही देण्यात आल्या . यावेळी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी पवार श्रीवर्धन तहसिलदार जयराज सुर्यवंशी , विस्तार अधिकारी हंबीर तलाठी अर्जुन भगत . तलाटी पार्वती वाघ तलाठी अभिजित हिवरकर , अराठी उपसर्पच मुजफर शेख नाजपरिनसादुला काजी , कमाल बुरूड बांगमाडला सरपंच अनघा भाटकर , अजित भाटकर , ग्रामसेवक , तलाठीब ग्रा . पं . सदस्यव ग्रामंस्थ उपस्थित होते . मेटकर्णी व बागमांडला ही दोन गावे डोंगरउतारवर असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो . धोका टाळण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे . प्रथम आराटी ग्रा . पं . मध्ये जावून त्या ठिकाणी सदस्यांची सभा घेतली व मार्गदर्शन करताना श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी पवार म्हणाले की , अतिवृष्टीमुळे किंवा इतर कारणामुळे मालिणसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये , यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी एखाद्या सुरक्षित ठिकाणी राहण्यास जावे . त्याचप्रमाणे बागमांडला भागातील हनुमान व रामवाडीमधील ग्रामस्थनी बागमांडला ग्रामपंचायत इमारत व समाज मंदिर या ठिकाणी राहयला जाण्याची विनंती केली . यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील प्रशासनाने संयुक्तपणे पहाणी करून मार्गदर्शन केले . सा . बां . खात्याच्या अधिकाया उपभागीय अधिकारी यांनी यावेळी सुचना दिल्या की , पावसाळ्याच्या कालावधीमध्ये दररोज रस्त्याची पाहणी करित राहावे अशा सूचना देण्यात आल्या . श्रीवर्धन उपविभागीय अधिकरी प्रविण पवार यांनी , श्रीवर्धन प्रशासकीय भवनामध्ये आपत्कालीन निवारण कक्ष तयार केला असून त्या ठिकाणी दिवस व रात्रौ कर्मचाच्याची कामकाज पाहत आहे . अतिवृष्टीमुळे पुराचा संभव , दरड , वीज कोसळणे इत्यादी अनेक प्रकारचे समस्या निर्माण झाल्यास ०२१४७ - २२२२२६ या ठिकाणी संर्पक साधवा . जेणेकरून आपणास आपत्कालीन प्रशासनाकडून मदत केली जाईल , असे सांगितले . पुरामध्ये वाहून अथवा वीज अंगावर पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास शासनाकडून लाखांचा निधी देता येईल . जर अंशतः पक्के किंवा कच्चे घर पडले , झोपडी पूर्ण नष्ट झाली , तर प्रतिघरास ६ हजारांचे निधी देता असेही त्यावेळी बोलताना ते म्हणाले . श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी पावसाळ्यामध्ये काळजी घ्यावी , असे आवाहन केले आहे

Post a Comment