दरड प्रवण क्षेत्राची प्रशासकीय यंत्रणे कडून पाहणी ; मेटकर्णी व बागमांडला ग्रामपंचायत चा समावेश


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात एक आठवडा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळ्या आहेत त्या धर्तीवर काल तालुका प्रशासन कडून मेटकर्णी व बागमांडला ग्रामपंचायतच्या दरड प्रवण भागाची पाहणी करण्यात आली.
    निऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अहवाला नुसार मेटकर्णी वर्ग 03 व बागमांडला वर्ग 02 दरड प्रवण क्षेत्रात वर्गीकरण केले आहे.श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वाराच्या लगत मेटकर्णी ग्रामपंचायत आहे .मेटकर्णी ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2749 आहे .एस टी स्थानकाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावर जवळपास 200 घरे वसलेली आहेत .घरांची बांधणी साधी आहे .तुरळक घरे सुव्यवस्थित स्थितीत निदर्शनास येतात . मेटकर्णी च्या भागात गरीब सर्वसामान्य लोकांची वस्ती आहे .विशेषतः मुस्लिम समाजातील फकीर ,व हिंदू समाजातील नियमित रोजनदारी करणाऱ्या बुरुड लोकांची संख्या जास्त आहे.मेटकर्णी  श्रीवर्धन शहरातील मुख्य डोंगराच्या पायथ्याशी आहे .त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे जमीन भुसभुशीत बनते त्या कारणे डोंगर माथ्यावरील झाडे उन्मळून पडतात व मोठमोठ्या दगडी पायथ्याशी येतात .मेटकर्णी च्या डोंगरावर वसलेल्या घरांना दरडीची धोका निर्माण झाला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बागममांडला ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे .शेती हा तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती व घरे ही मुख्यतः डोंगराच्या कुशीत वसलेले आहे त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
------------------------------------------
मेटकर्णी च्या डोंगरावर पन्नास वर्षा पुर्वी घरे वसलेली आहेत .आज दरडीची धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाने त्यांना पर्यायी घराकुला साठी जागा द्यावी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा 
    मुझफ्फर शेख (उपसरपंच मेटकर्णी )
-------------------------------------------

आज तालुक्यातील दोन दरड प्रवण गावाची पाहणी केली असून  स्थानिकांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे. जनतेच्या सुरक्षतेसाठी प्रशासन सतर्क आहे .कुणीही खोट्या अफवा वर विश्वास ठेवू नये .
   जयराज सुर्यवंशी (तहसीलदार श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा