बोर्लीपंचतन : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील बोलपंचतन गावासाठी असलेला गणेश विसर्जन घाट गटाराच्या पाण्याने वाढला गेल्याने त्याऐवजी जुन्या घाटाच्या पूर्वेला १४ वा वित्त आयोगातुन नवीन विसर्जन घाट बांधण्यात आला आहे गणेश विसर्जन घाटाबाबत ग्रामसभेमध्ये सरपंच गणेश पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याने व ह्यावर्षापासून पुन्हा बोर्ली नदीमध्ये गणेश विसर्जन होणार असल्याने नागरिकांतन समाधान व्यक्त करण्यात येत आहे . बोर्लीपंचतन येथे बोर्ली नदीवर असणारा विसर्जन घाट गटाराच्या पाण्याने वेढला गेल्याने मागील ५ - ६ वर्षे याठिकाणी गणपती विसर्जन होत नव्हते तर बोर्लीपंचतन येथील हजारो गणपतीचे विसर्जन गणेश भक्तांना २ किलोमीटर वर दिवेआगर समुद्र किनारी करावे लागत होते . तर त्यासाठी गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बापासाठी खिशाला चाट द्यावी लागत होती . तर काही डोक्यावर बाप्पांना घेत पायपीट करून विसर्जन करण्यासाठी न्यावे लागत ग्रामपंचायतदेखील काही प्रमाणात गाड्या उपलब्ध करून देत होती . मागील वर्षी गौरी गणपती विसर्जनावेळी बोर्लीपंचतन येथील ६ तरुण केवळ दैव बलवत्तर म्हणून की , काय बुडता बुडता वाचल्याने मोठा अनर्थ होता टळला होता . त्यावेळी समस्त ग्रामस्थांनी बोल पंचतन येथील विसर्जन घाटाबाबत ग्रामसभेमध्ये आवाज उठवला होता . त्यावर ग्रामपंचायतीने देखील हा प्रश्न गांभीयनि धेत विसर्जन घाटासाठी १४ वा वित्त आयोगातून सुमारे २ . ५० लाखांची तरतूद केली व जुन्या विसर्जन घाटाच्या पूर्वेला नवीन विसर्जन घाट बांधण्यात आला आहे यामुळे गणेशभक्तांना दिवेआगर येथे जाण्याचा वेळ व पैसे देखील वाचणार असल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पाटील व सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी दिनेश रहाटे यांनी ग्रामसभेमध्ये दिलेल्या शब्दांची पूर्तता केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment