श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
विद्यमान राज्य सरकार च्या आदेशाचा सन्मान करत श्रीवर्धन न्यायालयाने वृक्षारोपणा चा स्तुत्य उपक्रम श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात केला .
वसुंधरा संवर्धनासाठी शासकीय पातळीवर सकारात्मक भुमिका राज्य सरकारने घेतली आहे .जागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतु बदल यांची दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर ठोस पावले उचलली जात आहेत. राज्य सरकारने 01 जुलै2016 ला 2कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जनसमुदाय च्या सहभागातून वृक्षारोपण यशस्वी झाले आहे .त्यामुळे चालू वर्षी राज्यसरकारने 15 जून ते 07 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी 33 कलमी कार्यक्रम तयार केला आहे. राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तर या नुसार कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.प्रत्येक महिन्यास एक आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील 35 जिल्हे,358 तालुके, व 27,500 ग्रामपंचायात मध्ये 33 कलमी कार्यक्रम राबविला जाणार आहे.
श्रीवर्धन न्यायालयातील सर्व कर्मचारी ,वकील संघटना व स्वतः न्यायाधीश व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी तहसील कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले .पेरू ,सुरई व इतर विविध जातीच्या 25 वनस्पतीची रोपे लावण्यात आली .राज्य शासनाने पारित केलेल्या वृक्षारोपनाच्या परिपत्रकानुसार तालुक्यातील नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालय, वनविभाग व वकील संघटना कर्मचारी ए इ ईसाने,
आशिष वढावकर,मंदा ठोसर,विनोद घायाळ,राजेश वावेकर,रोहिदास जाधव, अमर गुरव ,नायब तहसीलदार निगुडकर ,बी.डी .ओ. सि. एन. हंबीर व कृषी अधिकारी पाटकर कार्यक्रम प्रसंगी हजर होते.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यानुसार आजमितीस प्रत्येक भारतीयाने एक झाड लावावे .त्यामुळे वसुंधरेचे संगोपन करणे सहज शक्य होईल .व मानव जातीचे भवितव्य सुंदर बनेल .वृक्षारोपण हा स्तुत्य उपक्रम आहे .
अमजद खान मुजावर (न्यायाधीश श्रीवर्धन न्यायालय )
पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्य आहे. राज्य शासनाने वृक्षारोपणा चा ठेवलेला कार्यक्रम निश्चित सर्वांसाठी फायद्याचा आहे .तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हा उपक्रम पोहचला पाहिजे त्या साठी मी प्रयत्नशील आहे .जन सहभागातून निश्चित च 13 कोटी वृक्षांची लागवड केली जाईल असा विश्वास आहे .
जयराज सूर्यवंशी (तहसीलदार श्रीवर्धन )
आज पर्यंत वृक्ष तोड मोठया प्रमाणात झाल्यामुळे त्याचा पर्यावरणावर अनिष्ट परिणाम झाल्याचे निदर्शनास येते आहे .पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. शासनाने वृक्षारोपणा घेतलेला निर्णय निश्चितच अभिमानास्पद आहे जनतेचा सहभाग निर्णायक ठरेल
Adv राजेश वावेकर (श्रीवर्धन )

Post a Comment