श्रीवर्धन च्या डोंगर पाखडीत दरड कोसळली ; घराचे मोठया प्रमाणात नुकसान



श्रीवर्धन प्रतिनिधी: संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील अतिवृष्टीमुळे डोंगर पाखडीतील रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात सर्वत्र पावसाने भयाण परिस्थिती निर्माण केली आहे.
श्रीवर्धन मधील  गणेश आळीतील  सचिन दवटे यांच्या घरावर दरडी मुळे माती व दगड येऊन पडले आहेत .गुरुवारी सकाळी पावसाने जोर पकडल्या नंतर डोंगराची लाल माती व दगडी घराकडे घरंगळत येण्यास सुरुवात झाली.पावसामुळे डोंगराची  माती भुसभुशीत झाली आहे .त्यामुळे दरड कोसळी आहे  गेल्या वर्षी सुद्धा सदर च्या घरावर दगडी कोसळल्या होत्या .त्या वेळी स्थानिक पातळीवर प्रसासनांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता कुठलेही पाऊल उचले नाही .त्याची परिणीती या वर्षी मोठया प्रमाणात दगडी घरावर कोसळल्या आहेत .
 सचिन दवटे यांच्या घराची भिंत व इतर भागास त्या मुळे मोठया प्रमाणात तडे गेले आहे. घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे .अद्याप शासकीय यंत्रणे कडून सदर घटने विषयी  कुठल्याही स्वरूपाची दखल घेण्यात आलेली नाही .त्यामुळे  दरड ग्रस्त कुटूंब भीतीच्या वातावरणात राहत आहे .

तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे दरड कोसळली आहे .त्यामध्ये माझ्या घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरडीचे दगड घरात घुसले आहेत .आमचे  नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो .शासना कडून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही .
 - सचिन दवटे (गणेश आळी श्रीवर्धन रहिवाशी)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा