म्हसळा : महेश पवार
म्हसळा पोलीस ठाण्याची नाकाबंदी व वाहनतपासणी मोहीम सकाळ पासून सुरु करण्यात आली . या मोहीमेमध्ये म्हसळा पोलीस निरीक्षक कोल्हे पोलीस निरीक्षक दूस , पोलिस नाईक सुर्यकांत जाधव, समर्थ सांगळे व ट्रैफिक पोलीस सरगडे , महिला पोलिस ओंबसे तसेच अन्य पोलीस अधिकारी यांचा समावेश होता . म्हसळा शहराच्या मुख्य रस्त्यावरती रस्त्यालगत दुचाकी , तीनचाकी वाहने सातत्याने पार्क केलेली असतात . अशा वाहनांवर म्हसळा पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली . तसेच म्हसळा नगरपंचायत समोरील , भाजी मार्केट , मिरची गल्ली समोरील उभी असणारी वाहने ( रिक्षा ) यांना देखील त्या ठिकाणावरून हळविण्यात आली असल्याचे म्हसळा शहरात ट्रैफिक जाम हि समस्या सुटण्यास मार्ग मोकळा होणार आहे. वाहन चालक लायन्सस नसताना देखील भरधाव वेगाने वाहन चालवत असतात त्यांच्यावर देखील कारवाई केली असल्याचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले . हि मोहम सातत्याने सुरु राहील . बाजारात रस्त्याच्या लगत उभ्या करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल जेणेकरून शहरातील ट्रैफिक समस्या सुटेल . आजच्या मोहीममध्ये तीनचाकी , दुचाकी अन्य वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . सकाळपासून म्हसळा शहरातील रस्ता अगदी मोकळा दिसत होता . ट्राफिक कमी झाली होतो . बाजारातील ग्राहकांना मोकळ्या श्वासाने फिरण्यास संधी प्राप्त झाली होती . हे असेच झाले तर म्हसळा शहर पोलिसांचे कायम स्वागत करेल , म्हसळा बाजार पेठ समोर व नगरपंचायत कार्यालय भागात एक ट्राफिक पोलीस असल्यास त्या ठिकाणी रहदारी करण्यास सोपे जाईल . त्या ठिकाणी पोलिसांची मागणी जनता करत आहे .
पोलिसांनी आज सुरु केलेली मोहीम चांगली आहे . यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्यांना चाप बसेल . या मोहिमेचे सातत्य कायम राहिले तरच असणारा उद्देश सफल होईल.
- बाळशेठ उर्फ सुभाष करडे , माजी विरोधी पक्षनेते , राजिप अलिबाग

Post a Comment