मुरुडच्या मार्केटमध्ये पेऱ्यांची कोळंबी : उधाण आणि अतिवृष्टीच्या धोक्याने नौका आगरदंडा बंदरात



मुरूड - जंजिरा : प्रकाश सत्रे
समुद्राल आलेले मोठे उधाण आणि अतिवृष्टीच्या भितीने राजपुरी - दिघीला सुमारे ३०० मच्छिमारी नौका सुरक्षेच्या कारणास्वत मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदारात आश्रयाला आल्या आहेत . त्यामुळे मुरूड शहरातील मार्केटमध्ये मासळी नसून खाडीतील पेरा मच्छीमारीची सफेद कोळंबी उपलब्ध असून भाव गगनाला भिडले आहेत . मुरूड परिसरात वादळी पाऊस आणि समुद्राला आलेल्या महाउधाणाने नौका अस्तव्यस्त होऊन नुकसान आणि दुर्घटना होऊ नये यासाठई राजपुरी - दिघी परिसरातील बहुसंख्य म्हणजे सुमारे १०० नौका तातडीने आगारदांडा बंदरात गेल्याची माहिती राजपुराचे जेष्ठ मासळी व्यावसायिक रमेश गिदी यांनी शनिवारी बोलताना दिली . समुद्र खवळला असून मोठ्या लाटा किनारपट्टीला जोरदारपणे धडकत आहेत . बोर्लीमांडला जवळच्या समुद्रात काल - परवा बंदी काळात गेलेल्या नौकेला अपघात होऊन एक जण बेपत्ता झाला आहे चरितार्थ चालवून पोटाची खळगी भरण्यासाठी समुद्रात जाण्याचा प्रसंग अंगलट आला आहे . याची दहशत मच्छिमारांतून व्यक्ता होत होती . यामुळे आता प्रशासनाची अधिक कडक अंमलबाजवणी सुरू आहे . किमान ४ दिवस या नौका राजपुरी बंदरात परतण्याची शक्यता नाही . खाडीतून मिळणारी किंवा उथळ समुद्रात केलेली सामुहिक पेरा मासेमारीतून उपलब्ध होणारी सफेद कोळेबी आणि काळ्या चिंबोऱ्यावरच मांसाहारी खवय्यांना येथे अवलंबून रहावे लागणार आहे . बोईंट्या , शिंगट्या , ओली आंबाड लाल कोळेबी काही प्रमाणात उलब्धत होते , अशी माहिती मासळी विक्रेते लक्ष्मी ज . पाटील हिने बोलताना दिली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा