श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भाजपचे ३ उपाध्यक्ष : पक्षवाढ होऊन विधानसभा जिंकणार का ? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता



श्रीवर्धन : प्रतिनिधी 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपची युती झाली नाही . दोन्ही पक्ष निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे गेले . श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्यामुळे नाराज कृष्णा कोवनाक यांनी अपक्ष उमेदवारी होऊन अर्ज भरला होता . परंतु , भाजपने त्यांना ए . बी . फॉर्म देऊन पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर करुन निवडणूक लढवली . शिवसेनेचे रवी मुंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसने अवधूत तटकरे यांना उमेदवारी दिली होती . या निवडणुकीत काँग्रेसची व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्यामुळे काँग्रेसने उदय कळे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली होती . अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अवधूत तटकरे ७७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले रवी मुंडे यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला . भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा कोवनाक यांना ११ हजार ५०० मते मिळाली . निवडणुकीनंतर पक्षाने कृष्णा कोवनाक यांना रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नेमणूक केली . काही दिवसानंतर सुधागड पालीचे माजी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र राऊत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते . त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती . त्या निवडणुकीत राऊत यांना पराभव पत्करावा लागला होता . त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला . पक्षाने त्यांनासुद्धा उपाध्यक्षपद दिले . त्यानंतर श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती व माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत शिंदे यांना शिवसेनेने अर्धचंद्र दिला होता . काही दिवस वेट अंड वॉचची भूमिका घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला . त्यांना पक्ष प्रवेशा वेळीचजिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले श्रीवर्धन मतदारसंघात ३ जिल्हा उपाध्यक्ष आहेत . कारण राजेंद्र राऊतयांचीकर्मभूमीपाली , सुधागड असली तरी जन्मभूमी श्रीवर्धन आहे ते मूळचे श्रीवर्धनचेच आहेत तिघेही शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात आलेले आहेत . तिघांनीही शिवसेना बाढविण्यासाठी अपार मेहनत घेऊन पक्ष वाढविण्याचे काम केले होते . तिघांनाही निवडणुका लढविण्याचा दांडगा अनुभव आहे मातब्बर राजकारणी असल्यामुळे या तिघांनी भारतीय जनता पक्षाची वाढ मतदारसंघात केल्यास आगामी विधानसभा निवडणूक पक्ष जिकल्याशिवाय राहणार नाही अशी आशा कार्यकत्यांना आहे मात्र श्रीवर्धन तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी पाहता तालुकाध्यक्ष व तालुका सरचिटणीस मुंबई निवासी असल्याने तालुक्यात संपर्क कमी आहे अनेक पदाधिकारी नामधारी आहेत . पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदारसंघातील ग्रामपंचायती जिंकणे महत्त्वाचे आहे . जिल्ह्यामधील एकाच मतदारसंघातून ३ उपाध्यक्ष असल्यामुळे भाजप कार्यकत्यांना आगामी विधानसभा पक्ष जिंकणार का ? अशी उत्सुकता लागली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा