श्रीवर्धन मच्छिमार्केट मध्ये स्वच्छतेचा बोजवारा ; दुर्गधीमुळे रोगराई वाढण्याची शक्यता

श्रीवर्धन मच्छिमार्केट मध्ये स्वच्छतेचा बोजवारा ; दुर्गधीमुळे रोगराई वाढण्याची शक्यता

श्रीवर्धन : वार्ताहर
श्रीवर्धन शहरातील मच्छिमार्केट परिसरात नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नसल्याने त्याठिकाणच्या कचऱ्यात किडे पडले आहेत . या परिसरात प्रचंड दुगंधी पसरली आहे . या परिसरात मच्छि विकण्यास अनेक महिला सकाळी नउ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बसलेल्या असतात तसेच त्याच ठिकाणी मच्छि विक्रेत्यांची दुकाने आहेत . वास्तविक पाहता मासळी विक्री करण्यासाठी नगरपरिषदेचे कौलारू मार्केट उपलब्ध असताना सुद्धा बाहेर बसल्यामुळे आपला धंदा जास्त होईल या आशेने सगळ्या मासळी विकणाच्या महिला मार्केटच्या बाहेर बसत असल्याने त्या ठिकाणी सुद्धा दुगंधीयुक्त चिखल झाला आहे वास्तविक पाहता मासळी किंवा चिकन व मटण कापताना त्यामधील टाकाऊ भाग मार्केटच्या मागील बाजूला असलेल्या नाल्यात टाकण्यात येत असल्याने त्या कचच्यामध्ये किडे पडतात व ते अनेकवेळा बाहेर येतात . मासळी किंवा चिकन व मटणाचे टाकाऊ भाग टाकण्यासाठी नगरपरिषदेने या परिसरात प्लास्टिकचे टब ठेवण्याची आवश्यकता आहे . त्यातच पावसाळा असल्यामुळे कचरा कुजत असल्याने दुर्गंधी मोठ्याप्रमाणावर पसरत आहे बाजारपेठेतील दादपुल परिसरात सुद्धा सडलेला भाजीपाला टाकल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणाहून नाक मुठीत घेउनच जावे लागते . सर्वप्रथम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्मचार्यांना घेउन मासळी विक्रीसाठी बाहेर बसणार्या महिलांना मार्केट मध्ये बसण्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे सध्या कचरा टाकला जात असलेल्या भागाची स्वच्छता करूल कीटकनाशके फवारण्याची गरज आहे . मासळीचा टाकाऊ भाग टाकण्यासाठी तातडीने टबची व्यवस्था करणे गरजेचे आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा