सावित्रीने ओलांडली धोक्याची पातळी ; खाडीपट्टीतील दरडग्रस्त गावांना सावधानतेचा इशारा...


प्रतिनिधी : आंबेत 
सध्या सर्वत्र जोरदार मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोंकण जलमय झाले आहे . अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर आंबेत परिसरातील सावित्री नदीने पात्र ओलांडले आहे त्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . मुसळधार पावसामुळे लिपणीवावे परिसरातील ग्रामस्थोनी इतरत्र जाण्यास प्रारंभ केला असून , याच परिसरात सन २००८ साली अशीच एक दरड कोसळून काही नागरिकांचा बळी या घटनेत गेला होता . त्यानंतर पुन्हा दरड ग्रस्त भागात अशीच घरे पुन्हा नव्याने निर्माण झाल्याने या भागात दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने येथील नागरिकाना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा