जनार्दन म्हसकर : खरसई प्रतिनिधी
खरसई आगरी समाज ग्रामस्थ मुंबई मंडळाच्या वतीने सामाजिक विधी नियमावली शिबिर नुकतीच मुबंई सेंटरमध्ये संपन्न झाली. मोबाईल मध्ये गुंग असणाऱ्या आणि समाजापासून दूर होत असलेल्या तरुणांना एकत्र करून सामाजिक विधी नियमावली बाबत चर्चा करण्यात आली. तसं या विधी साठी कोणत्याही प्रकारची नियमावली लिखित स्वरूपात उपलब्ध नाही पण, पिढ्यांनपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धती ज्या जेष्ठांनी पहिल्या अनुभवल्या रुजवल्या त्या आज च्या तरुणांमध्ये मांडण्यात आल्या. शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित मा. चंद्रकांत कानू खोत उपस्थित होते. कर्यक्रमास खरसई आगरी समाज ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पयेर, उपाध्यक्ष श्री महादेव लेपकर, सचिव आनंद उपकारे, खजिनदार कृष्णा पयेर, मुंबई विकास कमिटी अध्यक्ष श्री हरीश पयेर. माजी अध्यक्ष - श्री गणपत म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, पांडुरंग कांबळे आणि समस्त खरसई ग्रामस्थ मुबंईकर उपस्थित होते.
शिबिरात गावातील पारंपरिक सण उत्सव,
शुभ कार्य, गावातील दुःखद घटना यांवर तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment