प्रतिनिधी :
राज्यात कृषि निविष्ठा गुणवत्त्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असुन सदर कामासाठी राज्यात 1131 खते, बियाणे, किटकनाशके निरक्षकांची नेमणुक केली आहे. सद्यास्थितीत खरिप हंगामास सुरुवात झाली असुन पिकासाठी रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातून व केंद्र व राज्य शासनाने मंजुर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य द्यावे कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहुन जसे दुरध्वनीवरुन संपर्क साधुन विक्री करणारे विक्रते, शेतकऱ्यांना घरपोच खत देणारे अनधिकृत विक्रते यांचेकडुन खरेदी करु नये. खरेदी केलेल्या खताची रितसर पावती घेण्यात यावी व ती पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावी खतात भेसऴ असल्याची शंका दुर करण्यासाटी खतांची पाकिटे व गोणी सिलबंद असल्याची खात्री करावी.
केंद्र, राज्य शासनाने मंजुर केलेल्या खंताच्या ग्रेडसारखी दिसणारी, अनुकरण, नक्क्ल केलेल्या खतांची खरेदी करण्यात येऊ नये. खताच्या बॅगवर त्यामध्ये असणाऱ्या रासायनिक घटक, मुलद्रव्याचे प्रमाण नमुद केलेले असणे बंधनकारक आहे. त्याची खातरजमा करण्यात यावी. उदा. डी.ए. पी. रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण 18 टक्के व स्फुरदचे प्रमाण 46 टक्के असेल तसा मजकुर बॅगवर छापलेला असल्याची खात्री करावी खताच्या बॅगवर लिहलेला मजकुर नीट वाचुन, खात्री करुन विक्रेत्यांशी चर्चा करून शंका समाधान झाल्यानंतरच खत खरेदी करावी.
राज्यात काही ठिकाणी खत नियंत्रण आदेशातील समाविष्ठ मुळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकुर छापुन विक्री करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. डी.ए.पी. व पोटॅश या मुळ खताच्या गोणीची नक्कल करुन ऑर्गानिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची खत विक्री ही खत नियंत्रण आदेश 1985 या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी असा प्रकार निदर्शनास येत आहे. त्याठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी डि.ए.पी व पालाश युक्त खते खरेदी करताना दक्षता घ्यावी. बॅगेवरील मजकुराची शहानिशा करावी. दिशाभुल करणाऱ्या विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्यास तात्काळ नजिकच्या पंचायत समिती, कृषि विभाग व तालुका कृषि अधिकारी, यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment