बोलीं पंचतन परिसरामध्ये धुवांधार पाऊस सुरूच...


बोल पंचतन - अभय पाटील
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेली ३ दिवस पाऊस तुफान बरसत असून काम भात शेती मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने भात लावणीची काम ठप्प पडली आहेत . त्यामुळे भात लावणीची शेतकरी पाऊस कमी होण्याची आता वाट पाहात आहे तसेच परिसरातील कोंढपंचतन व कुडकी धरण ओव्हर पल झाले आहे तर कार्ल पंचतन धरण ५० टक्के भरले आहे , कोंढेपंचतन धरणावर मौजमजा करण्यासाठी परिसरातील तरुण वर्गाची गर्दी होत असली तर तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिघी सागरी पोलीस ठाण्याचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बोर्ली पंचतन परीसरास पावसाने चांगलीच झोडपून काढले असून सर्व परिसर जलमय झाले आहेत . मुंबई गोवा महामार्गावर तसेच दिघी - मोर्बा- माणगाव महामार्गावर रसत्याचे काम सुरु असल्याने रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे तर मोर्बा गाव जवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने सदर मार्ग बंद ठेवून हि वाहतूक लोणारे गोरेगाव मार्गे वळविण्यात आली होती त्यामुळे लांब पल्ल्याच्या एस् टी बसेस उशिराने धावत आहेत . मुसळधार पावसाने शेती मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असल्याने भात लावणी खोळंबली आहे तर शेतकरी आता पाऊस कमी होण्याची वाट पहात आहे . आज सकाळी पाऊस उसंत घेईल अशी चिन्ह दिसत होती परंतु अचानक सकाळी १० नंतर पुन्हा पावसाने जोरदार बसण्यास सुरुवात केल्याने शेतीच्या कामासाठी गेलेले काही शेतकरी वर्ग पुन्हा घरी परतल्याचे चित्र होते . 

कोंढापंचतन लघु पाटबंधारे धरण ५० टक्के भरले...
पाऊस जोरदार पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होत असून दिवेआगर , बोर्ली पंचतन , भरडखोल , कार्ले गावाच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या कोंढापंचतन लघु पाटबंधारे धरण ५० टक्के भरले आहे . हे धरण मोठे असून ह्या धरणास पाणी संचय होण्यासाठी जलस्रोत अतिशय कमी असल्याने १९६४ च्या उभारणीनंतर हे धरण एकदाही १०० टक्के भरले नाही . तर वडवली गावाजवळील कुडकी म्हसळा तालुक्यातील पाभरा , संदेरी लघु पाटबंधारे धरण पूर्णतः भरले असून त्यातून पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग होत आहे तर श्रीवर्धन शहरासह आराठी , जसवली , गालसुरे आदी गावना पाणीपुरवठा करणारे धरणही सुमारे ५० टक्के भरले आहे...

धरण परिसरामध्ये पर्यटकांना मज्जाव...
बोर्ली पंचतन गावास सहा महिने पाणीपुरवठा करणारे व बोर्ली पंचतन पासून पूर्वेला २ किमी डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गरम्य सौंदर्यामध्ये असलेले कोंढेपंचतन धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने तिथे मौज मजा करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातून तरुण वर्गाची नेमीच गर्दी असते एवढेच नाही तर काही मंडळी आपले कुटुंब घेऊनही धरणाच्या पाण्यामध्ये वर्षा सहलीचा आनंद घेत असतात ,काल रविवार असल्याने या ठिकाणी गर्दी होणार होती परंतु जोराचा पाऊस पडल्याने धरणातून बाहेर पडणाच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने तरुण वर्गाचा हिरमोड झाला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा