म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा तालुक्यात मान्सूनचे शनिवारी आज रौद्र रुप पहावयास मिळाले . म्हसळा शहराला लागून जाणारी जानसई नदी प्रवाहाच्या दुतर्फ वाहू लागली आहे . यामुळे म्हसळा शहरातून जाणारा दिघी रस्ता संपूर्णपणे पाण्याखाली गेला होता . दिघी पोर्टकडून कॉईल वाहतूक करणार्या टेलरच्या लांबच लांब रांग म्हसळा बायपासला लागली आहे . एका बाजूला निसर्गाचा कहर तर दुसच्या बाजूला बायपासला अवैधरित्या पार्क केलेल्या या ट्रेलरमुळे या मार्गावरून ये - जा करणार्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे . म्हसळा शहरात दिघी रस्त्यावर गटारांचे योग्य नियोजन नसल्याने हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला . अनेक वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत होती . कालपर्यंत १४२ . ८ मि . मी . इतक्या पावसाची नोंद म्हसळा तालुक्यात झाली आहे परंतु आजचा पाऊस पाहता कालपेक्षा दीडपट पाऊस झाला असल्याचे दिसत आहे . परंतु या पावसामुळे तालुक्यात अद्याप तरी कोणतीही नैसर्गिक आपत्तीची नोंद नसल्याचे तहसिलदार रामदास झळके यांनी सांगितले . नगरपंचायतीने दिघी रस्त्यावरील गटारांचे योग्य नियोजन केले असते तर आज दिघी रस्ता पाण्याखाली जाण्यासारखी परिस्थिती उद्भवली नसती . तसेच पावसात दिघी पोर्टची ही अवजड वाहतूक सुरु असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्यांचे साम्राज्य निर्माण होऊन तसेच या अवजड वाहनांच्या म्हसळा बायपासच्या अवैध पाकिंगमळे अपघात होण्याची शक्यता बळावली असल्याचे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन करडे यांनी म्हटले . कायदा आणि सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांना परंतू मोठ्या माशांना अभय अशी स्थिती असून , बेकायदा बांधकामे असतील किंवा दियी पोर्टची बेकायदा अवजड वाहतूक असो , याच कारणामुळे दिघी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याचे काँग्रेसचे म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ . मोईज शेख यांनी म्हटले .

Post a Comment