माणगाव - म्हसळा रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहतूक ठप्प...



साई : वार्ताहर
माणगाव ते दिघी या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्यावर अनेक वेळा वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे ९ जुलै रोजी या मार्गावरील चांदोरे नक़फोडी दरम्यान रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामध्ये मोठा माल वाहतूक करणारा ट्रक अडकला . त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली होती . या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अनेक एसटी ड्रायव्हर ट्रक चालक , लहान मोठे वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत . जनतेमध्ये सुद्धा या बाबत तीव्र नाराजी पसरली असून शाळेतील व महाविद्यालयीन विद्यायचे नुकसान होत आहे या मार्गावरील मोर्बा ते माणगाव हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून वाहन चालक व स्थानिक नागरीकांम ध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे . हा मार्ग खराब झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गोरेगाव - मांजरवणे मार्गे वळविण्यात आली आहे . या रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा