बोर्ला : अमूलकुमार जैन
काल रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील बोर्ली स्थानकासहित परिसरात पाणी तुंबले होते . पाऊस सुरू झाल्यापासून पाचव्यांदा पाणी वाढले . मात्र या कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे बोर्ली स्थानक परिसरात आज दुपारपासून पावसाने जोर पकडला असून सायंकाळी सात वाजेपर्यंत अडीच ते तीन फूट पाणी वाढले होते . वाहन चालक ह्या वाढलेल्या पाण्यातून वाहन चालविण्याची मजा लुटत होते तर काहींची वाहने ही बंद पडली होती . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत असणाच्या गटारांची पाहणी करून त्याची खोली वाढविणे , त्यातील कचरा काढून टाकणे , तसेच काही ठिकाणी गटारांची दुरुस्ती करावयाची असेल ती करणे आदी कामे केली जातात . मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षासुद्धा गटारांची पाहणी केली गेली नाही . त्यामुळे त्यांना वेळीच उपाययोजना करता आल्या नाहीत . सात ते आठ वर्षांपूर्वी बोर्ली येथील स्थानकातील गटाराचे करण्यात आले होते . त्यावेळी गटाराचे उंची ही सहाफुट होती . मात्र आज त्याची उंची ही किमान दोन फुटापर्यंत राहिली आहे . या गटारालगत असणारे दुकानदार , रहिवासी हे आपला कचरा गटारात आणून टाकतात या गटारावर बोरळू विश्राम गृहापासून ते स्थानकापर्यंत सहा ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस फुटांचा सिमेंट काँक्रीटचे स्लँब टाकण्यात आले आहे त्यामुळे त्या स्लॅबखाली वाहत गेलेला कचरा काढता येत नसल्याने तो तिथे साचला आहे त्यामुळे पावसाचे पाणी हे डोंगरातुन वाहून येऊन त्या गटारात येत असल्याने गटारातील पाण्याचा प्रवाह हा वाढत जातो . त्यामळे त्याला जाण्यासाठी वाट मिळत नसल्याने तो आपल्या सोबत असणार गाळ , आणि कचरा हा रस्त्यावरून घेऊन जात असतो . पाण्याचा प्रवाह हा कमी झाला की तो कचरा त्याचठिकाणी साठून राहतो आणि त्या कचन्याचा त्रास येणार्या जाणाच्या नागरिकांसाहत स्थानिकांनाही होत आहे गेल्या चारपाच वर्षांपासून बोर्ली स्थानकात येणार्या मुसळधार पावसामुळे तीन ते चारफुट पाणी साचले होते . मात्र यावर्षी अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे

Post a Comment