दिघीत भरावामुळे अपघातांत वाढ : माणगाव - दिघी राष्ट्रीय महामार्ग चालकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात ; एस. टी फेऱ्या गोरेगावमार्गे फिरवल्या..


म्हसळा : प्रतिनिधी
माणगाव - दिघी या राष्ट्रीय कामास वेगाने सुरवात झाली आहे . . ३४५ किमीच्या या कामाचे कंत्राट . एम . म्हात्रे इन्फास्ट्रक्चर या कंपनीने ४५८ कोटी रुपयांना घेतले आहे पहिल्या टप्प्याच्या कामाची सुरुवात माणगाव येथून झाली आहे. सदरच्या रुंदीकरणच्या कामामध्ये ११०० लहान मोठी झाडे बाधित झाल्याने त्याचाही अडथळा दूर करण्यात आला असून प्रत्यक्षात कामास सुरवात झाली . पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये अवघड वळणे कमी करणे , त्याचप्रमाणे मोठ्यांचे रुंदीकरण करणे , रस्त्याच्या दोन्ही बाजूस मातीचा भराव करुन सपाटीकरण करण्यात येत आहे पावसाचा वाढता जोर त्यात माणगाव ते दिघी या राष्ट्रीय महामार्गाच्या रंदीकरणासाठी मातीचा भराव तसेच सपाटीकरण करण्यात येत आहे मात्र ही माती रस्त्यावर येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक श्रीवर्धन व श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे येतात मुंबई , पुणे येथील पर्यटक वीकेंडसाठी श्रीवर्धन व दिवेआगरला पासून पसंती दर्शवतात . 

माणगाव शहरातून लोणेरे व साईमार्गे पर्यटक श्रीवर्धन व म्हसळा दिवेआगरकडे मार्गक्रमण करतात . हे मोर्बाघाट अंतर ४८ किलोमीटर अंतर आहे . तर मुंबई - गोवा महामार्गावरील लोणेरे पासून श्रीवर्धन ५० किलोमीटर अंतरावर आहे पर्यायाने पर्यटक दोन्ही मार्गांचा अवलंब करतात . साई मार्गे म्हसळा श्रीवर्धन हमरस्त्यावर नाइटने , मोर्बाघाट, घोणसे घाट ही अपघात प्रवण क्षेत्रे असून त्यामध्ये रोड रुंदीकरणाचे काम देखील अपघातांना आमंत्रण देत आहे . रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने एसटी महामडळास फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत . म्हसळा माणगाव बसची फेरी बंद पडल्याने शालेय तसेच रोजगारासाठी माणगाव महाडकडे जाणार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या मार्गावरील चांदोरे , मांजरोणे , नाईटणे व इतर आतील गावातील मुले मोठ्या प्रमाणात माणगाव , लोणेरे येथील तंत्रनिकेतनमध्ये तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत . मात्र सदर मार्गावरील रुदीकरणामुळे नळेफोड़ी , तसेच मोर्चा येथे पाणी साचणे त्याचप्रमाणे रस्त्यावर माती येण्यास सुरवात झाल्याने महामंडळाने मार्गावरील फेऱ्या बंद केल्या आहेत गोरेगावमार्गे या फेऱ्या वळविल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मुसळधार पावसामुळे रुंदीकरणाचे काम सुरु असलेल्या भागामध्ये साधारण दोन ते तीन फुट पाणी साचले आहे. महामंडळाच्या दहा ते बारा बसेस अडकून पडल्याने प्रवाशांसहित महामंडळाचे देखील नुकसान झाले मात्र दिघी पोर्टकडून होणाऱ्या अवजड़ वाहतुकीमुळे रविवारी रोड खचल्याची माहिती मिळाल्याने सदर मागविरील वाहतूक बंद करुन पर्यायाने गोरेगाव मार्गे करावी लागत आहे , यामुळे ३0 किमीच्या अंतरासाठी जास्त वेळ जात असल्याने महामंडळाचे वेळापत्रक कोलमड़ले आहे .
-रेश्मा गाडेकर, आगार प्रमुख , श्रीवर्धन आगार

माणगाव - म्हसळा रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या तसेच रोड पूर्णपणे चिखलमय होत आहे त्यामुळे या रोडवर अपघाताची श्रृंखला चालू आहे .
-महादेव पाटील माज़ी सभापती 

रुग्णवाहिकाही पडल्या अडकून..
मार्गावर पाणी साचल्याच्या घटनेमुळे बोर्ली , श्रीवर्धन येथून मुंबई अथवा अलिबाग येथे रुंग्णांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचे हाल झाले . काही तासांनंतर पाणी कमी झाल्यानंतर वाहने सोडण्यात आली . नाईटणे गावाजवळ रुंदीकरणाच्या कामाच्या भागातील जमीन खचल्याने सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे . दिघी पोर्टकडून होणारी लोखड़ी ट्रक म्हसळा येथे बाह्यवळणावर थांबवण्यात आल्याने याठिकाणी ट्रक टर्मिनलचे स्वरुप आले आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा