व्यक्तिविशेष : धर्मरत्न आदरणीय श्री प्रकाशजी जनार्दन म्हात्रे...

व्यक्तिविशेष : धर्मरत्न आदरणीय श्री प्रकाशजी जनार्दन म्हात्रे...

विशेष प्रतिनिधी
नमस्कार मित्रहो म्हसळा लाईव्ह च्या व्यक्तिविशेष ह्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत, धर्मरत्न या राज्यस्तरीय पुरस्कार विजेते आदरणीय श्री प्रकाश जी जनार्दन म्हात्रे. खरंतर  ३१ जुलै, १९६८ मध्ये खरसई गावामध्ये आपला जन्म झाला. बालपण आणि प्राथमिक शिक्षण आपण खरसईच्या रा. जि. प. मराठी शाळेत घेतलं, तर माध्यमिक शिक्षणासाठी आपण म्हसळा शहर गाठलं.  डी . एड. ची पदवी प्राप्त करून आपण शिक्षकी पेशानं विद्यादानाच कार्य करू लागलात. तरुणाईने फॉल्लो करावं असच तुमचं व्यक्तिमत्त्व होत. १९९८ मध्ये म्हसळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा "आदर्श शिक्षक" हा पुरस्कार  मिळवून अनेकांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला. पुढे २००५ मध्ये "आदर्श शिक्षक" रायगड जिल्हा परिषदेने आपणास सन्मानित केले. "विद्या भूषण" व "समाजभूषण" पुरस्काराने दैनिक म्हसळा टाईम्सने सन्मानित करून आपल्या कार्यास पोचपावती दिली.
खरंतर पुढची पिढी घडविण्याचा काम तुम्ही करत होता सोबतच तुम्ही संत निरांकरी मिशनशी जोडले गेलात आणि संत निरांकरी मिशनचा शांततेचा संदेश आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे काम  आपण करीत आहात. संत निरांकरी मिशनचे प्रचारक व म्हसळा श्रीवर्धन चे सत्संग संयोजक अशी दुहेरी भूमिका सांभाळून आपण कुटुंबप्रमुखाची जबाबदारीही आपण लीलया पेलत आहात. त्यात आपल्या सौं ची भूमिकाही महत्वाची आहे. आपण महाराष्ट्र पिंजून काढत असताना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सौ. कल्पना ताईंना म्हसळा लाईव्ह चा मनाचा मुजरा. निरांकरी मिशनचे उत्तम प्रचारक तर आपण आहातच सोबतच तुम्ही प्रगल्भ कवी आहात. एक वाचक आणि श्रोता म्हणून मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. खरंतर मी पण सोडून द्यावा हीच संत निरांकरी मिशन ची शिकवण म्हणून की काय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिलेला राज्यस्तरीय धर्मरत्न पुरस्कार आपण संत निरांकरी मिशनकडे सुपूर्द करून जनमानसात आपण सामान्य नागरिक म्हणून वावरत आहात. आपण करत असलेल्या कार्याला म्हसळा लाईव्ह चा सलाम आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या प्रेरणेने अनेक युवा असेच घडत राहो हीच इच्छा..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा