निगडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहीत्य वाटप कार्यक्रम संपन्न.

   
( म्हसळा प्रतिनिधी )        
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडी या शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य( पेन, पेन्सिल, रबर , छापनर, वह्या ई ) समाज सेवक श्री महेन्द्र जाधव  आणि श्रमजीवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.    यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणबी समाज म्हसळा तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष श्री. महादेवराव  पाटील साहेब-सरपंच तथा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , प्रमुख पाहुणे समाज सेवक श्री महेन्द्र जाधव साहेब, श्रमजीवी संस्था प्रतीनिधी जयसिंग बेटकर सर , कला शिक्षक दिलिप शिंदे सर, सौ.रंजिताताई काप अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती, सौ.संगिता आंबेकर अध्यक्षा महिला मंडळ निगडी, श्री. मंगेश मोरे,श्री. जयवंत मोरे,श्री. मिलिंद मोरे,श्री. दिपक वनगुले,श्री. संतोष चव्हाण, श्री. जयवंत मुकण ,श्रीम.विनिता पाटेकर, श्री. दिनेश रांगळे मुख्याध्यापक, श्री. रमेश जाधव उपशिक्षक, श्री. संभाजी जळकोटे उपशिक्षक तसेच आजी व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते. 
   कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी सांगितले की ,  या शाळेतील पट संख्या टिकवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ मंडळ स्थानिक आणि शाळा व्यवस्थापन समिती आम्ही एकत्रित येऊन त्याचे नियोजन करत असतो . शाळेत होणारे विविध उपक्रम, कार्यक्रम मध्ये आम्ही ग्रामस्थ संपूर्ण पणे लोकसहभाग घेतो तसेच आमचे गावचे मुंबई तरूण वर्ग संपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोनातून सहकार्य १००% करतात असे सांगून 
महेंद्र जाधव यांचे शैक्षणिक कार्य  कौतुकास्पद आसल्याचे श्री महादेव पाटील  यानी  सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा