म्हसळा नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट : आता लक्ष नव्या नगराध्यक्षाकडेव ;अनेक जन इच्छुक


म्हसळा : महेश पवार
म्हसळा नगरपंचायतीचा अडीच वर्षे कालावधी संपणार असल्याने नवा नगराध्यक्ष कोण असेल , याविषयी चर्चेला उधाण आले आहे म्हसळा ग्रामपंचायत रुपांतर होऊन अडीच वर्षाचा काळ अखेर संपला . अडीच वर्षांमध्ये म्हसळा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांना सव्वा वर्षाचा कालावधी देऊन त्या कालावधीमध्ये म्हसळा नगरपंचायतीमध्ये कोटी रुपयांची विकासकामे कांबळे यांनी केली आहे . शहरामधल्या मुलभूत गरजांना प्रथम प्राधान्य देऊन रस्ते , गटार , नाळे स्टेट लाईट तसेच पिण्याच्या पाण्याची योजना असे एक नव्हे अनेक कामे यांच्या कालावधीत करण्यात आले त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपताच महिला आरक्षण देऊन कविता बोरकर यांना नगराध्यक्ष पदाचा बहुमान प्राप्त करताच त्यांनी देखील नगरपंचायती विकासाकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले . परंतु , यांच्या कारकिर्दीमध्ये ज्याप्रमाणे विकास कामे व्हायला हवी होती ती झाली नाहीत , अशी चर्चा नागरिकांमधून सुरु आहे म्हसळा शहराला असणारा पाण्याचा साठा ह्यावर्षी देखील कमी पडला आहे . कचरा विल्हेवाट डंपिंग ग्राऊंडदेखील सुनियोजित व्यवस्था केली नाही , असे एक नव्हे अनेक विकास कामे आजही अपूर्ण आहे . शासनाचा कोटी रुपयांचा निधी परत जातोय की, काय ? अशा साखळीत पडलेली नगरपंचायत पुन्हा एखदा नवीन नगराध्यक्ष पदाकडे वाटचाल करीत असताना तिसऱ्या नगराध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागते , याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे यासाठी इच्छुक कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे १७ नगरसेवकांमध्ये प्रत्येक समाजाला प्रथम प्राधान्य देण्याचे काम तटकरे यांनी केले आहे . म्हसळा शहरामध्ये मुस्लीम समाज हा मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे . तसेच राष्ट्रवादीमध्ये मुस्लीम समाजदेखील सक्रीय आहे त्यांच्यामध्ये ह्यावेळी नगराध्यक्ष पदाचे दावेदार मुस्लीम समाज असू शकतो , असे राजकीय जाणकारांचे मत आहे . त्यांच्यामध्ये तटकरे यांचे निकटवर्तीय महिला बालकल्याण सभापती फलकनाझ मुबीन हुजूक यांचा नाव प्रथम चर्चेला येत आहे . त्यांनी महिला बालकल्याण सभापती असताना महिलांना विशेष सहकार्य केले होते . त्यांच्या कामाची पद्धत चांगली असल्याने त्यांचा आता होणार्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार होणार असल्याचे काहीसे संकेत प्राप्त झाले आहे . तर दुसया बाजूला माजी शिक्षण सभापती जयश्री कापरे यांचेदेखील नाव चर्चेत आहे तर गेली अडीच वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून मुस्लिम समाज नेते नासीर दळवी यांनी चांगले काम करून आपल्याला दिलेल्या पदाचा कार्यकाळ म्हसळा शहरासाठी बहाल केला होता . परंतु , आता होणारा उपनगराध्यक्ष हा कोण असेल , यासाठीदेखील प्रत्येक जण आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत . त्यांच्यामध्ये बांधकाम सभाती संजय कर्णिक संतोष काते , करण गायकवाड यांची नावे सर्व प्रथम चर्चेला समोर येत आहेत . तर आपल्याला उपनगराध्यपद मिळावे यासाठी अनेक गाठीभेटी सुरु झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत . शहराचा एकंदरीत विचार करता आत्तापर्यंत नगराध्यक्षपद इतर बाकी समाजाला प्राप्त झाले असल्यामुळे आता होणारा नगराध्यक्ष हा मुस्लीम समाजाचा असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . ह्या चर्चेला शहरामध्ये पावसाप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या चर्चेला उधाण आले आहे . असे जरी असले तरी मात्र इच्छुक उमेदवारांचा बाळहट्ट पुरविण्याचे काम सुनिल तटकरेच करणार असल्याने अंतिम निर्णय हा कोणाचा असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा