दांडगुरी : श्रीकांत शेलार
भात पिकावरील कीड रोगांचे उच्चाटन करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने क्रॉपसॅप योजनेअंतर्गत भात पिकाचे सर्वेक्षण करण्यात येत असून प्रथमच कृषी सहायक थेट बांधावरून पिकांची स्थिती एका अॅपवर ऑनलाइन नोंदवत आहेत . अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुभाष घाडगे यांनी दिली . आपल्याकडील पावसात सातत्य नसते अनियमित व खंडित पाऊस , प्रतिकूल हवामान यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होणे आता काही नवीन राहिले नाही . यामुळे शेतकऱ्यांनाना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो . अशावेळी शेतकर्यांना योग्य सल्ल्याची गरज भासते हा सल्ला देण्यासाठी पिकावरील रोगाच्या प्रदुर्भावाचे वेळोवेळी निरक्षण होणे गरजेचे असते . याच उद्देशाने तालुक्यात भात पिकाच्या किडरोग निर्मूलनासाठी कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ( क्रॉपसॅप) हा प्रकल्प राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत कीड रोगाचे सर्वेक्षण करून त्याची माहिती आपल्या वरिष्ट कार्यालयास कळवत होते . यावर क्षेत्रातील विविध संस्था कीडरोग व्यवस्थापनाचा सल्ला शासनास कळवत असत यातून नोंदणी केलेल्या शेतकर्यांना एसएमएसव्दरे रोगाचे व किडीचा अटकाव कसा करावा याचा सल्ला दिला जात आहे . हा प्रकल्प आता राज्य योजनेतून राबवला ८ जात असून पूर्वीसारखे बाह्य व्यवस्थेकडून सर्वेक्षण न करता आता कृषी कार्यालयाचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक सर्वेक्षण करीत आहेत . श्रीवर्धन तालुक्यातून सध्या खरशेत , शिस्ते , बार्लो , दिवेआगर, बोर्ली नागलोली , कुडगाव , हारवीत वकाळघर , कालें , शेखडी , वाळवंटी , सायगावं मारळ , देवघर , दांडा शिरवणे , मेघरे , श्रीवर्धन , भोस्ते , निगडी वाळवठी खुर्द , जसवली , गालसुरे , वावे तर्फ श्रीवर्धन , रानवली , वडघर या १४ गावांची कीड रोग सर्वेक्षणकरण्यासाठी प्रत्येक गावातुन २ फिक्स प्लॉटची निवड करण्यात आली आहे उपविभागीय कृषी अधिकारी श्री विष्णू साळवी हे या योजनेचे उपविभाग स्तरावरून मार्गदर्शन व सनियंत्रण करीत आहेत . शेतकर्यांना कीड रोगांची ओळख व्हावी , झालेल्या प्रदुर्भावाचे व्यवस्थापन कसे करावे यांची माहिती मिळावी , कीड रोग संदर्भात जागरूकता निर्माण होऊन संभाव्य नुकसान टाळता यावे , आपत्कालीन स्थितीत पूरक मदत देता यावी सांख्यिकी माहिती संकलित करून किडरोग व्यवस्थापनसंबधी शिफारस करता याव्यात या उद्देशाने क्रॉपर्सीप हा महत्वकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे . योजनेसाठी कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील २ फिक्स प्लॉटची निवड करण्यात आली आहे . असे तालुक्यातून १४ गावातील २८ फिक्स प्लॉट निवडण्यात आले आहेत . व प्रत्येक आठवड्यातील मंगळवार व गुरुवार हे दोनवार निरीक्षण घेण्यासाठी निवडण्यात आले आहेत . या प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन क्षेत्र निवडलेले बियाणे पेरणीची तारीख दिलेली खताची मात्रा केलेल्या मशागत आदी माहिती घेऊन त्या क्षेत्रातील पाच नमुना स्पॉट १ चौ . मी लांबीचे क्षेत्र कीडरोग निरक्षणासाठी फिक्स करण्यात आले आहे या क्षेत्रातून भात पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का यांचे बारकाईने निरीक्षण घेण्यात येते . बांधावरून थेट ऑनलाइन फिडिंग क्रॉपसॅप योजने अंतर्गत आता सर्वेक्षण व माहिती संकलनाची प्रक्रिया ऑनलाईन झाली असून थेट बांधावर एनआरसीने विकसित केलेल्या एका ऑपवर झालेले सर्वेक्षण पिकाचे क्लोजअप फोटो व तत्सम माहिती फीड केली जात आहे मारळ येथे गुरुवारी कृषी सहायक सचिन जाधव यांनी कृष्णा मांडवकर यांच्या भातपिकाचे सर्वेक्षण करून ऑनलाईन फिडिंग केले . तालुक्यात इतर ठिकाणीही कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक सर्वेक्षण करून माहिती नोंदवत आहेत . तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडूनही ऍडम पद्धतीने निरीक्षण घेण्यात येणार आहेत .

Post a Comment