दिघी गावामध्ये आरोग्य केंद्राची गरज..


श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन दिघी या ठिकाणी सरकारी दवाखाना नसल्यामुळे त्या ठिकाणच्या रूग्णांना खूप वेदना सहन करावे लागत आहे . जर का रूग्णाची तब्येत थोडया प्रमाणामध्ये आजारी असले तर बोली पंचतन किंवा श्रीवर्धन उपजिल्हा रूग्णालयामध्ये न्यावे लागते . अणि जर का रूग्ण गंभीर असेल तर मात्र माणगाव , महाड , पुणे अथवा मुंबई या ठिकाणी न्यावे लागत आहे त्यामुळे या गावातील नागरिकामध्ये तिव्र संताप व्यक्त करून गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज असल्याचे बोलले जात आहे . या गावची लोकसंख्या पाहिली असता ती समुरे ५ , ७३५ येवढी असुन हया दिघी गांवामध्ये कोळीसमाज बौध्दसमाज , भंडारी समाज मुस्लिम समाज असुन ते गुण्यागोविंदाने नादंत असतात . मात्र त्या ठिकाणी एखादया समाजातील एखादी व्यक्ती जर का आजारी पडली कि मात्र त्याला वाचविण्यासाठी पराकाष्टा जीवाची करावी लागत आहे . कारण तेथे दवाखाना नसल्यामुळे रिक्षा पासुन ते मोठ्या वाहना पर्यत रूग्णांना बोर्ली अथवा श्रीवर्धन किंवा तो गंभीर असल्यास त्याला माणगाव , महाड , पुणे अथवा मुंबई या ठिकाणी नेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे . त्यातच दिघी ते वडवली फाटा पर्यंत रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे वाहन चालकाला आपले वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असते . एखाद्या गरोदर मातेचा जणू काही पुनर्जन्मच म्हणावा लागतो . कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्राथमिक स्वरूपाची सुध्दा सोईसुविधा होत नाही . दिघी पोर्ट कंपनी कडून तात्पुरते स्वरूपाचा दवाखाना ठेवला असुन त्या दवाखान्याची वेळ ही सकाळी १० ते साधारण १२ या वेळेला उघडले जाते . दुपारच्या वेळेत तर पुर्ण असते . मात्र त्या ठिकाणी तर साध्या प्राथमिक स्वरूपाची देखिल औषधे सुध्दा उपलबध्द नसल्याचे तेथिल नागरिकांकडुन सांगण्यात येत आहे . तालुक्यातील एवढी मोठी लोकसंख्या असणाच्या गावामधिल हि दैनंदिन अवस्था निर्माण झाल्याने तेथिल नागरिकांमधुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावामध्ये साथीचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . आणि साध्या सर्दी , ताप , डोकेदुखी , कावीळ सारख्या साथीच्या आजारासाठी उपचार घेण्यासाठी श्रीवर्धनसारख्या ठिकाणी किंव्हा बोर्लीपंचतन हया ठिकाणी यावे लागते . त्यामुळे पैसा हा खर्च होतोच शिवाय वेळही खर्च होते . त्याच प्रमाणे रूग्णांही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागते . दिघी ग्रामंपचायत कडुन वरिष्ठांकडे या बाबत अर्ज केल्याचे कळते  मात्र वरिष्ठांकडुन कोणतेही ठोस असे पावले उचले गेलया नसल्याने त्याचा त्रास दिघी गावातील ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे . या दिघी गावांमध्ये प्राथमिक दवाखाना नसल्यामुळे या ठिकाणच्या रूग्णाची खुप हेळसांड होते . भविष्यामध्ये मात्र वेळेत उपचार न मिळाल्या मुळे एखाद्या रूग्णाला आपला जीव गमवावे लागले हे मात्र नाकरता येत नाही . 


मी अलिबाग येथे जिल्हयाच्या ठिकाणी अर्ज करून कळविले आहे की , दिघा गावी चांगले डॉक्टर व नर्सची व्यवस्था करावी अशी मागणी केलेली आहे . अजूनपर्यंत तशी व्यवस्था झालेली नाही . 
- सुप्रिया गोवारी सभापती , श्रीवर्धन

दिघी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना नसल्यामुळे रूग्णांना खूप वेदना सहन करावे लागते . प्राथमिक उपचारासाठी देखिल बोर्लीपंचतन व श्रीवर्धन उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणी न्यावे लागत असते .
- जनार्दन गोवारी

दिघी ग्रामंस्थासाठी प्राथमिक उपचारासाठी दवाखाना नसल्याने लहान बालके , वयोवृध्द  रूग्णांचे खुप हाल होत असतात . भविष्यामध्ये मोठे संकट निर्माण होऊ नये यासाठी आता तरी ठोस पाऊले उचलली गेली पाहजे
- लक्ष्मण मेंदाडकर 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा