म्हसळा ; प्रतिनिधी
बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्र असोसिएशनचे उदघाटन आणि लोकसंख्या दिन कार्यक्रम एकत्रितपणे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.एन.राघवराव सर हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणुन गोरेगाव येथील दोशी - वकील कला आणि गोरगाव नागरी सहकारी बँक विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयतील व्यवसायिक अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौ.निलिमा मिरजकर या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरवातीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शिरीष समेळ यांनी प्रास्तविकामध्ये महाविद्यालयात अर्थशास्र ओसिएशनच्या स्थापनेबाबतचा उद्देश आणि त्या अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहीती दिली तर व्यवसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.के.एस भोसले यांनी पाहुण्याचा परिचय करून देऊन लोकसंख्या दिन का साजरा केला जातो याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली प्राध्यापिका सौ.निलिमा मिरजकर यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतातील लोकसंख्या वाढीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम सांगताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोरात कठोर कोणते उपाय योजना करता येतील ते सांगितले तसेच भारतात एका दांपत्याला एकच मुल असणे गरजेचे का आहे आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शासनाच्या नविन घोष वाक्याची माहिती तसेच लोकसंख्या विषयक कार्यक्रमाची माहीती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमातील अर्थशास्त्र असोसिएशनचे उदघाटन करताना अर्थशास्त्राचा आपल्याला आपले करीअर घडविताना कसा फायदा होतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अध्यक्षस्थाना वरून आपले शुभेच्छापर मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन राघवराव सर यांनी लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर झालेल्या परिणामांची माहीती पावरपाँईटच्या साहयाने विद्यार्थ्यांना करून दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मेमन श्री नागे याविद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमास टि.वाय.बी.ए.आणि टि.वाय.बी.काँम यावर्गातील बहुसंख्य विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी सर्वाचे आभार मानले.

Post a Comment