दांडगुरी : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामविकास मंत्रालयाने दोन कोटी दहा लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देवून बांधकामास हिरवा कदील दिला . मात्र चार वर्षांपासून धुळखात पडलेल्या प्रस्तावास युती सरकारने लक्षही दिले नाही शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील कानाडोळा केला आहे . श्रीवर्धन पंचायत समितीची सध्या अस्तित्वात असलेली प्रशासकीय इमारत गेले कित्येक वर्षा पूर्वी बांधण्यात आली आहे . येथील सरासरी पर्जन्यमान जास्त असल्याने सध्याच्या इमारतीला गळती लागून ती जीर्ण झाली आहे . त्याबरोबरच पंचायत समितीच्या सध्याच्या इमारतीमध्ये सर्व विभागांना पुरेशी जागा नसल्याने कार्यालयीन कामकाजासाठी ही इमारत पडत होती . तालुक्यातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामीण भागातील नागरिकांना कामानिमित्त पंचायत समितीच्या कार्यालयात नेहमी यावे लागते , मात्र जागा अपुरी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींची एखादी बैठक घेण्यासाठी जागाच त्यावेळी मात्र ग्रामसेवक , आरोग्य , पशुसंवर्धन , कृषी , शिक्षण या विभागांच्या कर्मचाच्यांना बाहेर उभे राहावे लागते . पंचायत समितीला नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे प्रशासकीय इमारतीची गरज ओळखून आ . सुनील तटकरे यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना श्रीवर्धन पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिल्या होत्या . तसा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला होता . हा प्रस्ताव श्रीवर्धन पंचायत समितीने ३ जुलै २०१४ रोजी पारित केला होता . ९ सप्टेंबर २०१४ रोजी इमारत बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती . इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आली होती . श्रीवर्धन मधील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दसच्या मजल्यावर पंच्यात समितीच्या कार्यालयाची निर्मिती प्रस्तावित होती त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी पण मान्यता दिली होती . मात्र गेली चार वर्षांपासून प्रशासनाच्या वादात इमारतीचे बांधकाम रखडले आहे
प्रस्तावित सुसज्ज इमारतीत
नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये अद्ययावत सोई सुविधांचा समावेश करण्यात आला आहे संगणक प्रणाली , संरक्षक भिंत रेन हॉर्वेस्टींग व फायर फायटिंग , अपंगांसाठी रेलिंग आदी सुविधांचा त्यामध्ये समावेश आहे श्रीवर्धन तालक्याच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाच्या या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे जनतेची कामे जलद होण्यास मदत होणार आहे .
पंचायत समितीची नवीन इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घेण्याचे ठरले होते त्यानंतर ते तांत्रिक मंजुरीसाठी अधीक्षक अभियंता कडे मंजुरीसाठी गेले असता , पहिल्या मजल्यावर प्रताधिकारी कार्यालय असल्याने इमारतीच्या देखभालीची व दुरुस्ती कोण करणार यांमुळे पुढील कार्यवाही रखडली आहे .
- के वाय बारदेस्कर , प्रभारी कार्यकारी अभियंता - अलिबाग

Post a Comment