माणगाव ते दिघी रस्त्याची चाळण : खड्डयांनी वाहन चालक हैराण ; अपघातांचे प्रमाणही वाढले


प्रतिनिधी,
माणगाव - म्हसळा - दिघी या राज्यमार्गाची अक्षरशः खड्यांनी चाळण झाली आहे . त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आणि जीवावर उदार होऊन आपले वाहन चालवावे लागत आहेत . या मार्गाची तातडीने दुरूस्ती करून खड्डे बुजविणे आवश्यक आहे . मात्र शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत . याच मार्गावरून हरिहरेश्वर , श्रीवर्धन समुद्रकिनारा तसेच दिवेआगर सोन्याचा गणपती आणि पर्यटनस्थळे पाहण्यास पर्यटक नेहमीच येत असतात . त्यामुळे या मार्गावर रात्रंदिवस रहदारी असते . तसेच हा राज्यमार्ग आता दिघी - माणगाव - पुणे महामार्ग होणार असल्याने या मार्गाचे काम सुरू आहे . या महामार्गाची फेरी वाढल्याने अनेक ठिकाणी मोठ्या बांधण्याचे काम सुरू आहे . तसेच ठिकठिकाणी माती व खडीचे भराव केले जात आहेत . सध्या सर्वत्र जोरदार पावसाने मुसंडी मारली असल्याने भरावाची माती व खडी रस्त्यावर आली आहे . त्यामुळे बऱ्याच वेळा वाहने घसरून अपघात होत आहे . यापूर्वी अनेक छोटे - मोठे अपघात झाल्याने काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे . अशाच परिस्थितीत दिघी बंदरातील अवजड वाहने सातत्याने रहदारी करीत असल्याने ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे . माणगाव ते मोर्बा या ५ किमी . च्या अंतरात रस्ता शोधून सापडत नाही . रस्त्यात खड्डा आहे की , खड्यात रस्ता आहे का ? असा प्रश्न बाहनचालकांना पडत आहे . या महामार्गासाठी शासनाने २४० कोटी रूपये खर्च करण्याचे ठरविले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा