म्हसळ्यात विशेष कवी संमेलन संपन्न...


म्हसळा : प्रतिनिधी
पंचायत समिती व शिक्षण विभाग म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यातील पहिला आणि विधायक असा कवि संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाला म्हसळा पं . स . सभापती उज्वला सावंत , उपसभापती मधुकर गायकर , पं . स . सदस्या छाया म्हात्रे , सामाजिक कार्यक सतिश शिगवण , नेवरूळचे माजी सरपंच रामदास रिकामे , गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते . यामध्ये कवी गजानन पाटील , मोरेश्वर पाटील , सुमेध जाधव , दिप पारधे , सर्वेश तरे , प्रकाश पाटील या राज्यातील चांगल्या पदावर कार्यरत असण्याच्या कवींनी अतिशय सुंदर अशा कविता सादर करून शैक्षणिक उद्वोधन केले . तालुक्यातील शिक्षकांनीही या कवी संमेलनात भाग घेऊन आपापल्या कविता सादर केल्या . या प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनात उपसभापती मधुकर गायकर यांनी सर्व कवींचे स्वागत करून म्हसळ्यासारख्या ग्रामीण भागातील शिक्षकांना कवींचा सहवास व मार्गदर्शन ही तालुक्यासाठी निश्चितपणे अभिमानास्पद बाब असून गटशिक्षणाधिकारी यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे सांगितले . सभापती उज्ज्वला सावंत यांनी शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले गेले २ वर्षे तालुक्याला एकही अधिकारी नसताना तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून ग्रामीण भागातील शिक्षकांना कविसंमेलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या बुद्धीला चालना देण्याचा कार्यक्रम संपन्न केला असून प्रभारी गटशिक्षणाधिकारी काळात तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्याचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सभापती उज्वला  सावंत यांनी सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा