श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात एक आठवडा पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली .त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालू ठेवण्याचा प्रयत्न केला . वेळास मधील हेल्प ग्रुप फाउंडेशन ने तरुणाच्या सहकार्यातून स्वछता मोहीम राबविली .
वेळास मधील तरुणाईने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत गाव परिसरातील पर्यावरणास बाधक प्लास्टिक व इतर तत्सम घटक एकत्र करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली .पावसाच्या पाण्याचे गावातील सर्व गटातून व्यवस्थित वहन होत नव्हते त्यामुळे रोगराई आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली त्या वेळी गावातील तरुण वर्ग हेल्प ग्रुप फाउंडेशन च्या माध्यमातून एकत्र आला .गाव परिसरा सोबत वेळास चा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आली.समुद्र भ्रमंती साठी येणारे पर्यटक व गाव पातळीवरील स्थानिक जनता यांच्या कडून अनावधानाने टाकण्यात आलेला कचरा गोळा करून त्याची योग्य व्यवस्थापन करण्यात आले.अतिउत्साही पर्यटकांकडून सामाजिकतेचे भान न ठेवता समुद्र किनाऱ्यावर टाकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.वेळास निसर्ग संपन्न गाव आहे. गावास मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे.त्या मुळे पर्यटकांची सदैव वर्दळ असते. गावातील जास्तीत जास्त लोक रोजगारासाठी मुंबई कडे स्थलांतरित झाले आहेत. शेती सोबत पर्यटन व्यवसाय जोर धरत आहे .वेळास मधील पर्यटनास चालना देण्यासाठी स्वच्छता अनिवार्य आहे. तरुणाई ला याची जाणीव आहे .
पर्यटन , आरोग्य व पर्यावरण संवर्धन या तिन्ही घटकांसाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे. हेल्प ग्रुप फाऊंडेशन च्या वतीने ग्रामस्वच्छते साठी सहा कचऱ्या पेटी ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आल्या आहेत.त्या साठी किरण तामसे व जे दारुवाला यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे . गाव पातळीवरील सरकारी यंत्रणा व गावातील तरुण पिढी यांचा एकोपा निश्चितच समाज प्रगती साठी समाधानकारक आहे .
-----------------------------------------चार दिवस पावसाचे प्रमाण जास्त होते त्यामुळे गावातील विविध ठिकाणी पाणी साचले होते .त्यामुळे स्थानिक जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता .त्या कारणास्तव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .
- धवल तवसाळकर (सभासद हेल्प ग्रुप फाऊंडेशन वेळास )
-------------------------------------------
आमच्या गावातील पर्यटनाचा विकास व्हावा .त्या सोबत पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे .हेल्प ग्रुप फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे .
दर्शना कोदरे (कॉलेज युवती वेळास )
------------------------------------------
गावातील तरुण वर्ग व हेल्प ग्रुप फाऊंडेशन यांनी राबवलेली स्वछता मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. एक आठवडा जोरदार पाऊस पडला त्याचा परिणाम जनजीवनावर झाला होता .जनतेच्या आरोग्यासाठी वेळास ग्रामपंचायत सदैव तत्पर व सतर्क आहे .
बाबुराव शिलकर (सरपंच वेळास )

Post a Comment