श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात काल रात्री पासून पावसाने जोर पकडला आहे .दोन दिवसांच्या विश्रांती नंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरु झाल्या आज दुपारी गोनघर मध्ये वादळी पावसाने थैमान मांडले .पावसाचा जोर व वादळी वारे यामुळे म्हसळा ते गोंनघर रस्त्यावरील विद्युत महामंडळाचे 22 केव्ही उच्चदाब वाहिनीचे आठ खांब पडले आहेत .त्या कारणे विद्युत महामंडळाच्या
बोर्लीपंचतन विभाग अंतर्गत येणाऱ्या बोर्ली, दिवेआगर, वडवली , भावे, कुडकी, शिस्ते, कापोली, वेळास, आदगाव, सर्वा, हरवीत, कुडगाव, दिघी, नानवेल या गावांचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे.विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती ची पाहणी केली आहे.सदर वादळात कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झालेली नाही.
------------------------------------------
काल पासून पावसाचे प्रमाण जास्त आहे. आज गोनघर जवळ विद्युत महामंडळाचे खांब पडले त्या व्यतिरिक्त कुठे नुकसान झालेले नाही . नैसर्गिक आपत्ती प्रसंगी जनतेच्या सुरक्षे संदर्भात पोलीस प्रशासन संवेदनशील आहे .
धर्मराज सोनके (सहाय्यक पोलीस निरीक्षक बोर्लीपंचतन)
-------------------------------–----------
वादळी पावसाने विद्युत महामंडळाचे खांब पडले आहेत .त्यामुळे आमच्या कडील विद्युत पुरवठा बंद पडला आहे.विद्युत महामंडळाने लवकरात लवकर विद्युत पुरवठा पुर्ववत करावा .जीर्ण खांब अगोदरच काढले असते तर आज ही चांगले खांब वादळात पडले नसते . पावसाळा सुरू झाल्यापासून लाईट्स चा सारखा लपंडाव चालू आहे .
धवल तवसाळकर (ग्रामस्थ वेळास )
-------------------------------------------
वादळी पावसामुळे विद्युत महामंडळाचे जवळपास आठ खांब जमीनदोस्त झाले आहेत. उद्या सकाळी दुरुस्तीला सुरुवात केली जाईल .दोन दिवसात विद्युत पुरवठा पुरवत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .
महेंद्र वाघपैजन (अभियंता विद्युत महामंडळ श्रीवर्धन)

Post a Comment