रायगडकराना अनुभवला वर्षभरातील सर्वात मोठी भरती : दिवेआगर समुद्र किनारी मोठे नुकसान ; किनारी गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन..


बोर्लीपंचतन : वार्ताहर
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जिल्हयात चांगलाच जोर धरला आहे हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढला आहे . त्यामुळे रविवार १५ जुलै रोजी सर्वात मोठी भरती रायगडकरांनी अनुभवली . या सर्वात मोठ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार समुद्रकिनाऱ्याला बसला . अलिबाग शहरातील अलिबाग , वरसोली , किहिम , मांडवा , नागाव , आक्षी , रेवदंडा परिसरात समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या . या लाटांची उंची जवळपास मीटर उंच होती . अजून पुढील २ ते ३ दिवस समुद्रातील स्थिती अशीच असल्याने किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वायाचा जोर वाढला आहे . त्यामुळे रविवार १५ जुलै रोजी सर्वात मोठी भरती अनुभवली . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सर्वात मोठ्या भरतीने नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले . किंबहुना येत्या २ दिवस समुद्राला मोठ्या भरती येणार असल्याने प्रशासनाने समुद्रकिनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत १२ ते १७ जुलै असे ६ दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४ . ९६ मी . उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील असा हवामान विभागाने इशारा दिला होता . शनिवारी जिल्ह्याच्याकिनारी भागात उधाणभरती आली . मोठ्या लाटांमुळे श्रीवर्धनमधील दिवेआगर समुद्रकिनारी असणार्या टेहळणी मनोऱ्याचे नुकसान झाले आहे . शिवाय पर्यटकांसाठी असलेल्या आसन बैठकांचे नुकसान झाले आहे . समुद्राच्या अजस्त्र लाटा बाहेर आल्याने समुद्रकिनारी जाणारी पायवाटदेखील खचली गेल्याचे दिसते . मोठ्या लाटांचा थरार अनुभवण्याकरीता समुद्रकिनारी गर्दी केली होती . दरम्यान , काही गावांच्या हद्दीतदेखील समुद्र व खाडीचे पाणी शिरले होते परंतु , कोठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही . पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये , असे आवाहन प्रशासनाने केले आहे वेळास या ठिकाणी समुद्राच्या पाणी मानवी वस्तीकडे घुसले आहे . या पाण्यामुळे किनार्यावरील खूप प्रतिबंधक सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत दिवेआगर व वेळास समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत . किनाच्यावरील काही गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत . मुरुड मोठ्या लाटांनी तांडव केल्याचे समुद्रकिनारीदेखील पाहायला मिळाले . मुरुडमधील प्रसिद्ध व कायमच पर्यटकांनी गजबजलेला काशिद समुद्रकिनारा मोठ्या लाटा किनारी भागत धडकत असल्याने सुना पडला आहे 

समुद्राच्या लाटांची तिव्रता हळूहळू वाढत असून किनार्याची धुपही मोठ्या प्रमाणावर होत चालली आहे संरक्षक बंधारा लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही देणगीदारांच्या मदतीने कोळीवाडा किनारी छोटेखानी बंधारा बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाकडून अद्ययावत व धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्याशिवाय दिवेआगरचा समुद्र किनारा वाचणार नाही . नाहीतर किनार्याची धूप  लवकर होईल व दिवेआगर किनार्याचे सौंदर्य देखील नष्ट होण्याची भिती आहे . त्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निश्चित पाठपुरावा केला जाईल 
- उदय बापट, सरपंच दिवेआगर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा