प्रतिनिधी : श्रीवर्धन
दिनांक ३०/०७/२०१८ रोजी प्रशासकीय इमारत श्रीवर्धन येथे कृषी विभागा मार्फत भात पीक खत व कीड रोग व्यवस्थापन कार्य शाळा कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती श्री बाबुराव चोरगे,पंचायत समिती सदस्य श्री मंगेश कोमनाक,आत्मा कमिटी अध्यक्ष श्री उदय बापट,मा. जिल्हा परिषद सदस्य श्री अविनाश कोलंबेकर,तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी भांडवलकर,मंडळ कृषी अधिकारी श्री सुभाष घाडगे,सुपारी सशोधंन केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री महालदार,प्रगतशील शेतकरी श्री.महेंद्र हुमने,श्री इफतिकार चरफरे तसेच कृषी विभागाचे कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरवात पोलादपूर येथील दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजोलन करण्यात आले.तसेच बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शाखेच्या सदस्यपदी निवड झाल्याबदल श्री उदय बापट यांचा सन्मान करण्यात आला.
प्रस्तावपर भाषणा मध्ये श्री भांडवलकर यांनी तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या क्रॉप सॅप योजने विषयी माहिती दिली व भात पिकाचे किड व रोग तसेच खत व्यवस्थापन या कार्यक्रमा विषयाची रूपरेषा विषयी माहिती दिली.या नंतर श्री उदय बापट यांनी शेतकऱ्यांनी भात पिकांच्या वैशिष्ठपूर्ण जातीची व सुधारित भात लागवडीच्या पद्धतीचा अवलंब करण्याचा सूचना केल्या व शेतकऱ्यांनी शेती मध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या नंतर श्री महेंद्र हुमने यांनी भात पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यानां भात पिकावरील कीड व रोग ओळखता आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.यानंतर श्री महालदार यांनी भात पिकाचे खत व्यवस्थापन या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना समतोल खतांचा वापर करण्याचे अहवाहन केले.यानंतर श्री सुभाष घाडगे यांनी आंबा व काजू लागवड व्यवस्थापन याविषयी माहिती सांगितली व शेतकऱ्यांनी काजू बियांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने काजूचे क्षेत्रा मध्ये वाढ करण्याचे आव्हान केले.तसेच नंतर श्री अविनाश कोलंबेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी भात शेतीवर अवलंबून न राहत भाजीपाला पिके घेण्याचे तसेच शेतीला पूरक असे व्यवसाय करण्याचे आव्हान केले व कृषी विभागाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अश्या सूचना केल्या.या नंतर श्री सचिन जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती सांगितली.अध्यक्षीय भाषण मध्ये श्री बाबुराव चोरगे यांनी शेतकऱ्यांनी शेती मध्ये यांत्रिकीकीकरचा उपयोग करावा तसेच पारपांरीक पद्धतीने शेती न करता सुधारित पद्धतीने शेती करावी तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले.
तसेच श्री योगेश महाले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Post a Comment