म्हसळा : प्रतिनिधी
श्रीवर्धन मतदार संघातील
म्हसळा ,श्रीवर्धन व तळा तालुके विकासाचे उंबरठ्यावर असतानाच तीनही
तालुक्यातील महसुल विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी म्हसळा पं.स. चे माजी सभापती महादेव पाटील यानी शासनाकडे केली आहे.
जिल्हा, तालुक्याचा विकासात महसूल विभागाचा अत्यंत महत्वाचा वाटा असतो. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी ( कलेक्टर), उपविभागीय अधिकारी ( प्रांत), तहसीलदार यांचे कार्यालयांतील आकृतीबंधा प्रमाणे आवश्यक असणारा सर्व स्टाफ कार्यरत असणे महत्वाचे असते. म्हसळा तालुक्यात ५ लिपीक व एक मंडळ आधिकारी व एक तलाठी अशी ७ पदे रिक्त आहेत. अशाच पध्दतीने तळा व श्रीवर्धन तालुक्याची परिस्थीती आहे.
श्रीवर्धन -म्हसळा तालुक्यांत दिघी पोर्ट या आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदराचे निमित्ताने पुणे -दिघी हा राष्ट्रीय महामार्ग घोषीत झाला आहे. त्याचे पहील्या टप्प्यातील माणगाव -दिघी या ५५ की.मी.मार्गाचे भू- संपादन व अन्य काम सुरु आहे. आशाच पद्धतीने इंदापूर -तळा- आगरदांडा ह्याचेही राष्ट्रीय मार्ग म्हणून काम सुरू आहे.या प्रक्रियेत महसूल विभागाचा मोठा वाटा असून ही सर्व प्रक्रिया सुकर होण्यासाठी व त्याच बरोबरीने महसूली विभागातील शासकीय योजना, निवडणूक, पुरवठा, शासकीय वसुली, महसुली आकारणी व जमाबंदी, अती क्रमणे, कुळवहीवाट, पीक पैसेवारी, कातकरी उत्थान योजना आशी सर्व कामे गतीमान होण्यासाठी जिल्हयांतील अन्य तालुक्यांप्रमाणे श्रीवर्धन ,म्हसळा व तळा तालुक्यातील रीक्त पदे भरावी अशी महादेव पाटील यांची मुख्य मागणी आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा व तळा हे तीनही तालुके प्रशासनानी दुर्लक्षीत ठेवले आहेत, तर अनेक वेळा कर्मचाऱ्यांची बदली या तीनही तालुक्यात होऊनही कर्मचारी हजर होत नाही अशा घटना घडतात ,वरीष्ठ आधी काऱ्यांच्या उदासीनते मुळे ही पदे रीक्त रहातात.
महादेव पाटील. माजी सभापती .पं.स. म्हसळा.
Post a Comment