प्रतिनिधी : रोहिणी गाव
सामाजिक वनीकरण विभाग रायगड - अलिबाग परिक्षेत्र म्हसळा- श्रीवर्धन आयोजित "वृक्ष दिंडी" रोहिणी गावांत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वृक्ष दिंडीसह वृक्षारोपणही करण्यात आले. दिंडीमध्ये को.ए.सो. प्रभाकर नारायण पाटील काळसुरी शाळा व प्रथमिक मराठी शाळा रोहिणीगांव चे विद्यार्थीही सहभागी झाले होते. या दिंडीमधून विद्यार्थी मित्रांनी पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. दिंडी मध्ये शिक्षकांसह अनेक ग्रामस्थ मंडळीही सहभागी झाली होती.

Post a Comment