प्रतिनिधी : मेंदडी
शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना . अनंत गीते यांच्या संकल्पनेतून साकार झालेला शिवआरोग्य फिरता दवाखाना ३० जुलै रोजी म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावामध्ये दाखल झाला . या फिरत्या दवाखान्याचा गावातील व परिसरातील अनेक रूग्णांनी लाभ घेतला . दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आरोग्य खर्चामुळे ग्रामिण भागातील नागरिकांची आर्थिक हिरमोड होत असतानाच शिव आरोग्य सेवेमार्फत अशा रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व मोफत औषध वाटपामुळे त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे शिवआरोग्य सेवेच्या स्वागतासाठी शिवसेनेचे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रविंद्र लाड , डॉ . सुबोध पडवळ , राऊत , फारमासिस्ट निखील देसाई , अभिजीत , अवजड वाहतूक सेनेचे श्याम कांबळे , दिपल शिर्के , जुबेदभाई मेंदडी कोंड ग्रामस्थ , मोठ्या प्रमाणात तपासणीसाठी आलेले रुग्ण व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते . शिव आरोग्य सेवेचा लाभ तळागाळातील गरजु लोकांना निरंतर सुरु रहावा , यासाठी प्रत्येक महिन्यात दोन ते तीनवेळा ही फिरती आरोग्य गाडी म्हसळा तालुक्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रविंद्र लाड यानी सांगितले . शासनाची मेंदडी येथील जिल्हा परीषद आरोग्य सेवा विस्कळीत असतानाच शिवआरोग्य सेवेची फिरती गाडी मेंडडी कोंड गावामध्ये आल्यामुळे स्थानिकांनी शिवसेनेचे आभार मानले .
Post a Comment