प्रतिनिधी : नेवरूळ
ग्रामपंचायतीवर गेली दहा वर्ष सत्ता राष्ट्रवादी पक्षाची असताना या वेळी मात्र शिवसेनेचा भगवा फडकला . नेवरूळ गावात गेली दहा वर्ष विकास कामे न झाल्याने या वर्षी ग्रामस्यांनी शिवसेनेला संधी दिली आहे राष्ट्रवादीने नाममात्र कामे केली त्याच्यामध्ये देखील कामाचा दर्जा नाही साकव बांधला तो देखील खचला असे ऐक नव्हे अनेक विकास कामांचा धांगड धिंगा केला आहे . हे सर्व पाहुन ग्रामस्थांनी अखेर नेवरूळ ग्रामपंचायतीमध्ये भगवा फडकवला आहे . या वेळी जेष्ठ शिवसैनिक विद्यमान उपसरपंच नामदेव महाडिक यांनी ऐका संवाद बैठकीत आपल्या विकास कामावर लक्ष वेधले आम्हाला ज्या ग्रामस्थांनी विश्वासाने निवडून दिले आहे त्यांचा विश्वास सार्थक करणार आज पर्यंत गावात विकास झाला नाही त्याची आम्हाला जाणीव आहे कारण सरपंच होते ते केवळ आपल्या स्वार्थी साठी होते तसे आता होणार नाही . गावाला असणाच्या मुलभूत सुखसोई पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार आहोत . या वेळी सरपंच आर्या महागावकर तर उपसरपंच म्हणून नामदेव महाडिक हे निवडून आले आहेत . ग्रामपंचायतीवर सरपंच व इतर ५ सदस्य सेनेचे निवडून आले आहेत . नवनिर्वाचित सदस्य पदी स्वप्नील लाड , रुक्मिणी लाड , राजेश्री लाड हे निवडून आले . दि . ३० जून रोजी झालेल्या उपसरपंच निवडीत नामदेव महाडिक हे बिनविरोध निवडून आल्याने शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला . या नंतर झालेल्या कार्यक्रमात सरपंच व उपसरपंच व सदस्य यांनी संपूर्ण नेवरूळ ग्रामस्थांचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड , म्हसळा शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के , शिवसेना वरवठणे गण विभाग प्रमुख सुनील दिवेकर , म्हसळा तालुका संघटक बाळा म्हात्रे गणेश बाजे , बबन वाजे , म्हसळा काँग्रेस अध्यक्ष डॉ . मुईज शेख , म्हसळा युवासेना अधिकारी अमित महामुनकर , दीपल शिर्के, गणेश हेगिष्टे, शिवसेना महिला संघटक रिमा महामुनकर , प्रसन्न निजामपूरकर हे उपस्थित होते .

Post a Comment