पास्को कंपनी विरोधात मनसे आक्रमक ; जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाडांनी आंदोलनाचा इशारा



माणगाव : प्रतिनिधी 
सात वर्षापूर्वी माणगांव तालुक्यातील विळे भागाड परिसरात पास्को महाराष्ट्र स्टिल कंपनीची स्थापना झाली . कंपनीच्या स्थापनेपासून स्थानिकांनी अनेक संघटनांच्या मदतीने विविध आंदोलने केली परंतू आजपर्यंत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळू शकलेला नाही . केवळ काही राजकीय नेत्यांचे लांगूलचालन करीत कंपनीने स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत . यापुढे हा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापीही सहन करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मनसेने केलेल्या मागण्या त्वरीत पोस्को प्रशासनाने मान्य न केल्यास मनसे आपल्या खास स्टाईलने खळखट्याक आंदोलन छेडेल असा गर्भित इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी मनसे तालुका कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला . यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष सुबोध जाधव , तालुका उपाध्यक्ष प्रतिक रहाटे , मनसे कार्यकर्ते संजीव गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . तालुक्यातील बिळे भागाड येथील पास्को स्टिल कंपनीत सुरु असलेला अनोगोंदी कारभार व स्थानिकावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी शनिवारी १४ जुलै रोजी मनसेतालुका कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती . यावेळी गायकवाड यांनी आक्रमकपणे पास्को कंपनीतच्या अनागोंदी कारभारावर टिका करीत स्थानिकांच्या मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली . 

                       ◆ प्रमुख मागण्या ◆
पास्को कंपनीत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे केमिकल पाणी त्वरित थांबवावे कंपनीचे ट्रेलर घेऊन जाताना अपघाताचे प्रमणा वाढले आहे त्याला आळा घालावा . स्थानिकांच्या हाताला काम द्यावे . कंपनीकडून विकासासाठी सामाजिक दायित्व निधी त्वरीत मिळावा , कंपनीत मालवहातूक करण्यासाठी स्थानिक नियोजित सहकारी माल वाहतुक संघटनेला संधी मिळावी , कंपनीतर्फ सुसज़ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावे , कंपनीची स्वत ची अँबूलन्स सेवा असावी , अपघातात मृत्यू अथवा जखमींना त्वरीत आर्थिक मदत मिळावी . सी . एस . आर फंडातून बसस्थानक बांधण्यात यावे , स्थानिकांना भंगारचे टेंडर मिळावे , कंपनीत निघणार्या प्रत्येक कामात स्थानिकांना ७५ टक्के कामे प्राधान्याने मिळावीत , कॅन्टीन सुविधेबाबत स्थानिक महिला किंबा महिला बचत गटांना प्राधान्य मिळावे , कंपनी मेंटेनन्सचे काम कोरीयन कंपनी करते ते महाराष्ट्रीयन लोकांना मिळावे अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा