जंगल भागातून येणाच्या वीज वाहिनीमुळे श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच विजेचा लपंडाव : म्हसळा श्रीवर्धनला हवी भूमिगत वीज वाहिनी



श्रीवर्धन : संतोष चौकर
मागील दहा ते बारा दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा दिवसातून आठ ते बारा तास खंडीत होत आहे . मागच्या आठवड्यात गोंडघर सबस्टेशन कडे येणाऱ्या आठ वीजवाहक तारा व खांब जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्या होत्या , त्या दुरुस्तीसाठी श्रीवर्धन कडे जाणारा वीजपुरवठा बंद ठेवावा लागत होता . त्यातच सोसाट्याचा वारा असल्याने म्हसळा ते श्रीवर्धन दरम्यान विजवाहक तारा घनदाट जंगलातून आल्या असल्याने झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांना टेकत असल्यामुळे श्रीवर्धनमध्ये बीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडतात . सदरच्या विजवाहक तारा ज्या जंगलातून येतात ती जागा वनविभागाची असल्यामुळे झाडांच्या फांद्या जास्त प्रमाणात तोडल्यानंतर वनविभाग महावितरणच्या कर्मचार्यांना फांद्या तोडण्यासाठी मज्जाव करतात . गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून श्रीवर्धन तालुक्यात खंडीत झालेला वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ववत झाला . आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जांभूळ ते वाडांबा या गावांच्या दरम्यान एक भलामोठा वृक्ष विजवाहक तारांवर पडल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत वीज गायब होती . श्रीवर्धन मधिल वीजपुरवठा खंडीत होण्याचे एकमेव कारण जंगलातून येणार्या वीजवाहक तारा हे आहे जरी या ठिकाणी टॉवर लाईन टाकली तरी झाडांच्या फांद्या लागुन पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तरी महावितरणने म्हसळा ते श्रीवर्धन दरम्यान भुमि गत केबलचा वापर करुन लाईन टाकल्यास श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार खूप कमी होतील भूमीगत वीजवाहक केवल टाकण्यासाठी खर्च मोठा येत असला तरी विद्यत खांब व तारा यांचा खर्च वाचेल व वेळोवेळी बिघाड शोधण्यासाठी होणारी धावपळ होणार नाही . श्रीवर्धन शहरात दोन वर्षांपूर्वी भूमीगत केबल टाकण्यात आल्या आहेत परंतु त्यांचा वापर अद्याप सुरू झालेला नाही . याबाबत श्रीवर्धन म हावितरणचे उप कार्यकारी अभियंता वाकपूंजण यांच्या जवळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि , आम्ही टॉवर लाईनचा प्रस्ताव तयार करत आहोत , परंतु भुमि गत केवलचा सुध्दा प्रस्ताव पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा