म्हसळा : महेश पवार
म्हसळा नगर पंचायतीची अडीच वर्षे उलटून गेली त्यांच्यामध्ये म्हसळा नगराध्यक्षकाने म्हसळा शहरांच्या विकासासाठी लाखो रुपयांचे विकास कामे केली असल्याचे ठाम मत गराध्यक्ष कविता बोरकर यांनी स्पष्ट केले आहे . त्या बोलताना म्हणाल्या की म्हसळा नगर पंचायतचा विकास कामांचा आलेख हा चढता आहे प्रथम नगराध्यक्षकाने केलेली कामे आणि सुरुवातीपासून विकास कामाचा झपाटा लावला आहे नगर पंचायत झाल्यापासून रस्ते अनुदानासाठी ४० लाखांची तरतूद केली आहे . त्याचप्रमाणे म्हसळा शहरांमध्ये पाणी टंचाईच्या काळामध्ये शहरातील लोकांना पाणी पुरवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे . शहरातील अंतर्गत रस्ते , अंतर्गत गटारे , अपंग लाभार्थ्यांना निधी , महिला व बालकल्याण सभापती मार्फत ड्रेस , साड्या वाटप विविध भागांमध्ये संरक्षण भिंत याचप्रमाणे १४ वित्त आयोग , स्वच्छ महाराष्ट्र अभियान , रस्ते , अनुदान , सुवर्ण जयंती , नगरोत्थान महाअभियान , जिल्हास्तर अशा विविध योजना मार्फत म्हसळा शहरासाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला लाभले आहे . माझ्या कारकीर्दीमध्ये सर्व सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे . संपूर्ण शहरांमध्ये स्ट्रोट लाईट लावण्याचे भले मोठे काम कारकीर्दीत केले केले . याही पुढे असेच काम करण्याचे भाग्य प्राप्त झाल्यास संपूर्ण म्हसळा शहर सुजलाम , सुफलाम करेन असा ठाम विश्वास नगराध्यक्षा कविता बोरकर यांनी केला आहे .

Post a Comment